Tarun Bharat

पंचायत समिती सदस्यांना मिळणार निधी

ग्रामविकास मंत्र्यांच्या घोषणेकडे लक्ष
कोल्हापूर/प्रतिनिधी

14 व्या वित्त आयोग निधी पासून वंचित राहिलेल्या पंचायत समिती सदस्य यांना आता विकास कामासाठी हक्काचा निधी दिला जाणार आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य यांना ही पंचायत समिती सदस्य यांच्या बरोबरीने वाटा दिला जाणार आहे. प्रत्येकी दहा टक्के प्रमाणात हा निधी मिळण्याची शक्यता आहे पंधराव्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणी पासून त्याची सुरुवात केली जाणार आहे. ग्रामविकास विभागाकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

महायुती सरकारच्या काळात 14 वा वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात आला त्यामुळे पंचायत समिती सदस्य केवळ टपाली कामापुरतेच काय असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र महायुतीच्या सरकारने यावर गांभीर्याने घेतली नाही राज्यात महा विकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर ग्रामविकास विभागाने धडाकेबाज निर्णय घेतले. त्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांना ही वित्त आयोगातील निधी देण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ याबाबतची कधी घोषणा करतात याकडे राज्यातील पंचायत समिती सदस्यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता कोल्हापूर शासकीय विश्रामगृहावर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांची पत्रकार बैठक होणार आहे. या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करतात का याची उत्सुकताही पंचायत समिती सदस्यांना लागलेली आहे.

Related Stories

अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती चिंताजनक

Patil_p

ग्रामीण भागातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी १५ कोटी मंजूर

Abhijeet Khandekar

उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन

Archana Banage

रत्नागिरी : कोकण मार्गावर उद्यापासून ‘गांधीधाम-तिरुनेवल्ली फेस्टिवल’ धावणार

Archana Banage

मेट्रो प्रकल्पामुळे राजकीय प्रदूषणही कमी होणार; मुख्यमंत्र्यांचा मविआला टोला

Archana Banage

ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचं निधन

Archana Banage