Tarun Bharat

पंच रॉयस्टन जेम्स यांचे नव्या नियमावलीबद्दल क्रीडापटूंना मार्गदर्शन

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

गेल्या 18 महिन्यांपासून शहरात विविध क्रीडाप्रकार कोरोनाच्या महामारीमुळे ठप्प होते. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने नोव्हेंबरपासून बेळगाव जिल्हा सार्वजनिक शिक्षणखाते व बेळगाव जिल्हा पदवीपूर्व सार्वजनिक शिक्षण खाते आणि बेळगाव शहरातील विविध क्रीडा संस्थेच्या वतीने विविध स्पर्धा भरविण्याचा कार्यक्रम जाहीर होत आहे. याचाच एक भाग म्हणून माजी राष्ट्रीय फुटबॉल पंच रॉयस्टन जेम्स यांनी बेळगावमधील विविध शाळेत उदयोन्मुख फुटबॉलपटूंना फुटबॉल नियमाबद्दल मार्गदर्शन केले.

जागतिक फुटबॉल फेडरेशनने (फिफा) 2021-22 सालाकरिता फुटबॉल खेळातील नियमात बदल केले आहेत. याची माहिती उदयोन्मुख फुटबॉलपटूंना व्हावी, यासाठी रविवारी सकाळी सेंट झेवियर्स स्कूलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी पंच रॉयस्टन जेम्स यांच्याशी चर्चा केली आणि बदलण्यात आलेले नियम समजावून घेतले.

Related Stories

जिल्ह्यात 35 हजार जनावरांना लम्पीची लागण

Amit Kulkarni

ट्रायथलॉन स्पर्धेत सृष्टी पाटील पाचवी, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम स्पर्धेत पहिली

Amit Kulkarni

कोडीहळ्ळी चंद्रशेखर पोलीसांच्या ताब्यात

Patil_p

जिल्हा पोलिसांची कारवाई, शहर पोलिसांची बेपर्वाई

Amit Kulkarni

युनियन जिमखाना-टिळकवाडी क्रिकेट क्लब यांच्यात अंतिम लढत

Patil_p

आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी अथर्व सावनूरची निवड

Amit Kulkarni