तरुण भारत

पंजाबच्या माजी काँग्रेस प्रमुखाचा पक्षाला रामराम

ऑनलाईन टीम तरुण भारत

माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi Former Chief minister of Punjab) यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल नेतृत्वाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर काही आठवड्यांनंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पंजाब युनिटचे माजी प्रमुख सुनील जाखड (Sunil Jakhar) यांनी आज पक्ष सोडल्याची घोषणा केली आहे. जाखड यांनी शुक्रवारी ट्विटरवर लिहिले होते की मी शनिवारी “दिल की बात” शेअर करणार आहे. त्याच शीर्षकासह त्यांनी शनिवारी त्याचे फेसबुक लाईव्ह शेअर केले.

“गुडबाय आणि शुभेच्छा, काँग्रेस,” असे जाखड यांनी म्हंटले आहे. त्यांनी त्यांच्यावरील कारवाईचे नेतृत्व करणार्‍या पक्षाच्या माजी सहकार्‍यांवर कठोर टीका केल्यानंतर फेसबुक लाईव्ह व्हिडिओमध्ये असे म्हटले. दरम्यान, काँग्रेसचे (congress) उदयपूरमध्ये चिंतन शिबीर (chintan shivir) सुरु आहे. हे शिबीर सुरु असताना अशा वेळी जाखड यांनी काँग्रेस सोडणे हा पक्षाला धक्का मानला जात आहे.

गेल्या महिन्यात, काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने जाखड यांना दोन वर्षांसाठी पक्षातून निलंबित करून सर्व पदांवरून काढून टाकण्याची शिफारस केली होती. या पाच सदस्यीय समितीचे अध्यक्ष पक्षाचे ज्येष्ठ नेते एके अँटनी आहेत. जाखड़ यांच्यावर काय कारवाई करायची यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला अँटनी यांच्याशिवाय सदस्य तारिक अन्वर, जेपी अग्रवाल आणि जी. परमेश्वर उपस्थित होते.

दरम्यान, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा विजय झाल्यांनतर काँग्रेसच्या पराभवाला पंजाब काँग्रेसच्या माजी प्रमुखांनी माजी मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर टीका केली होती आणि त्यांना पक्षासाठी जबाबदार असल्याचे म्हटले होते. पक्षाने त्यांना दोन वर्षांसाठी निलंबित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisements

Related Stories

गोव्याच्या राज्यपालांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Sumit Tambekar

या मुलीच्या निर्धाराला काय म्हणावे!

Patil_p

बैलूर येथे नवरात्रोत्सवाची उत्साहात सांगता

Patil_p

व्हिसा फ्रॉडप्रकरणी चिनी लष्कराशी संबंधित महिला शास्त्रज्ञाला अमेरिकेत अटक

datta jadhav

नियंत्रण रेषेवरील तैनात जवानांना मिळणार अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्स

datta jadhav

पेट्रोल-डिझेल दरात वाढीचे सत्र थांबेना

Patil_p
error: Content is protected !!