Tarun Bharat

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिले लॉक डाऊन वाढवण्याचे संकेत

ऑनलाईन टीम / चंदीगड :

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी लॉक डाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. 

सिंग म्हणाले, पंजाब ची लोकसंख्या अडीच कोटीपेक्षा जास्त आहे. पंजाब मध्ये कोरोना रुग्णांची संख्या 132 असून आत्तापर्यंत अकरा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

माझ्या मते लॉक डाऊन अजून चालूच ठेवले पाहिजे. असे नाही केले तर कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत जाईल. यामुळे संकट वाढू शकते. पुढे ते म्हणाले, आम्ही आत्तापर्यंत 2877 नमुन्यांची तपासणी केली आहे. पंजाबच्या लोकसंख्येच्या मानाने चाचणीचे प्रमाण हे फारच कमी आहे. 

दरम्यान, आज होणाऱ्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळ लॉक डाऊन संदर्भात निर्णय घेणार आहे. आत्ताची परिस्थिती पाहता हे संकट अधिक वाढू नये म्हणून लॉक डाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. 

Related Stories

शिरोळ तालुक्यात यड्रावकर गटाचा दबदबा कायम

Archana Banage

आमदारांचं निलंबन एकतर्फी, विरोधी पक्षाचा नंबर कमी करण्याचा हा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस

Archana Banage

सोलापुरातील लॉकडाऊनचा निर्णय लोकप्रतिनिधींशी चर्चा करून घेणार : पालकमंत्री

Archana Banage

कॅनडात कोरोना रुग्णांची संख्या 95 हजार पार

Tousif Mujawar

अंकिता हत्या प्रकरणाची उच्च न्यायालयाकडून दखल

Patil_p

बिहार विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर

datta jadhav