Tarun Bharat

पंजाबच्या शेतकऱ्याला अस्वस्थ करत देशानं एकदा इंदिराजींच्या हत्येपर्यंत किंमत दिलीय – शरद पवार

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पवार यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी आंदोलनावरील उदासिन भुमिकेचा समाचार घेत. पंजाबमधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका असे सांगत एकदा देशानं अस्वस्थ पंजाबची किंमत दिलीय. ही किंमत इंदिरा गांधी यांच्या हत्येपर्यंत दिली आहे, असं मत व्यक्त करत मोदी सरकारला इशारा दिला आहे.

पंजाबमधील शेतकऱ्याने देशाच्या अन्न – धान्य पुरवठ्यात सातत्त्याने योगदान दिले आहे. तसेच देशाच्या संरक्षणात ही ते अग्रभागी आहेत. शेतकरी आंदोलकांशी केंद्राची भुमिका असमंजस असल्याचे ही ते यावेळी म्हणाले. या आंदोलनात पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानचा काही भागातील जास्तीत जास्त शेतकरी सहभागी झाले आहेत. यामध्ये पंजाबच्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणिय आहे. त्यामुळे आमचं केंद्र सरकारला सांगणं आहे, की पंजाबमधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका. असे ही पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Related Stories

राजनाथ सिंग यांचा चीनला कठोर संदेश

Omkar B

रेकॉर्डवरील गुन्हेगार तडीपारीच्या रडारवर

Patil_p

मालदीवमध्ये भीषण आग ; ९ भारतीयांचा मृत्यू

Abhijeet Shinde

होम आयसोलेशनबाबत सातारकरांमध्ये संदिग्धता

Patil_p

ईडीच्या पाच अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा, मुख्यालय सील

datta jadhav

सपा आमदार पुष्पराज जैन यांच्या ठिकाणांवर आयकरचे छापे

datta jadhav
error: Content is protected !!