Tarun Bharat

पंजाबमधील आमदारांशी राहुल गांधी करणार आज चर्चा!

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


पंजाबमध्ये सध्या काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. तर, आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार असल्याने पार्टी हायकमांडून या कलहावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पंजाबमधील आमदारांशी चर्चा करणार आहेत. काँग्रेस आमदार व राहुल गांधी यांची भेट दिल्लीतील राहुल गांधी यांच्या निवासस्थानी होणार आहे.


पंजाब काँग्रेसमधील असंतोषाच्या मुद्य्यावर मागील काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री अमिरदर सिंग, त्यांचे स्पर्धक नवज्योतसिंग सिद्धू यांच्यामधील मतभेद समोर येत आहेत. या दोघांमध्ये समझोता करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या दरम्यान, अनेक नेते-आमदार यांनी दिल्लीत हजेरी लावली आणि आपापले म्हणणे श्रेष्ठींनी नेमलेल्या समितीपुढे मांडलेले आहे. त्यामुळे आज काँग्रेस आमदार व राहुल गांधी यांच्यात होणाऱ्या बैठकीकडे व त्यांच्यातील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

 
पंजाबमधील प्रदेश कमिटीने अध्यक्ष सुनील जाखड आणि प्रदेशचे वित्त मंत्री मनप्रीत सिंह बदल यांनी बुधवारी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. ज्या प्रकारे पक्षात अंतर्गत वादावादी सुरु आहे त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. पंजाब मधील काही आमदाराच्या मुलांना सरकारी नोकरी देण्यात आली आहे. त्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. राहुल गांधींना भेटल्यानंतर लवकरच या समस्या सोडवल्या जातील. 

Related Stories

काश्मीरमध्ये चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा

Patil_p

कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

ममता बॅनर्जी ५० हजार मतांनी विजयी होतील; तृणमूल नेत्यांचा दावा

Abhijeet Shinde

कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी एक लाख कोरोना योद्धा निर्माण करण्यात येणार – पीएम मोदी

Abhijeet Shinde

समाजवादी पक्षाच्या बैठकीला आझम, शिवपाल राहिले अनुपस्थित

Patil_p

चिंताजनक : तामिळनाडूत दिवसभरात 5,890 नवे कोरोना रुग्ण; 120 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!