Tarun Bharat

पंजाबमधील कोरोना रुग्णांनी पार केला 90 हजारांचा टप्पा

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पंजाबमध्ये मागील 24 तासात 2 हजार 896 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 90 हजार 032 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  


मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील एकूण 90,032 रुग्णांपैकी 65 हजार 818 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 2 हजार 646 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

  • 21,568 रुग्णांवर उपचार सुरू 


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 14 लाख 96 हजार 340 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 21 हजार 568 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 489 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 88 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

  • शहर   एकूण रुग्ण संख्या 
  • लुधियाना  15,291
  • जालंधर    10,695
  • पटियाला   9752
  • अमृतसर   7417
  • सास नगर  7727

Related Stories

छत्तीसगडमध्ये 12 नक्षलवाद्यांना अटक

Patil_p

अमेठीत काँग्रेसला झटका देणार सप

Patil_p

सपाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

Patil_p

धोकादायक : मध्यप्रदेशात आढळला कोरोना डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण

Tousif Mujawar

‘पाचारण’ केलेले अधिकारी दिल्लीची भेट टाळणार

Patil_p

पहिलीत प्रवेश 6 वर्षे पूर्ण असतील तरच

Patil_p