Tarun Bharat

पंजाबमध्ये आज ‘मत’संग्राम

चंदिगढ, लखनौ / वृत्तसंस्था

पंजाबमधील सर्व 117 जागांवर रविवार, 20 फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. राज्यात 93 महिलांसह एकंदर 1,304 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरून आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. सकाळी 8 वाजता मतदानाला प्रारंभ होऊन ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार असल्याची माहिती पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. करुणा राजू यांनी दिली. पंजाबमध्ये मतदानाची तारीख 14 फेब्रुवारी होती. मात्र गुरु रविदास जयंतीमुळे निवडणूक आयोगाने तारखेत बदल करत 20 फेब्रुवारीला मतदान घेण्याची घोषणा केली होती. पंजाबबरोबरच उत्तरप्रदेशमध्ये तिसऱया टप्प्यासाठी 20 फेब्रुवारीला मतदान होत आहे. तिसऱया टप्प्यात 16 जिल्हय़ांमधील 59 मतदारसंघांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल. तिसऱया टप्प्यासाठी उत्तरप्रदेशमध्ये सुमारे 2.15 कोटी मतदार 627 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. 20 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असलेल्या 16 जिह्यांमध्ये औरिया, एटा, इटावा, फारुखाबाद, फिरोजाबाद, हमीरपूर, हाथरस, जालौन, झाशी, कन्नौज, कानपूर देहात, कानपूर नगर, कासगंज, ललितपूर, महोबा आणि मैनपुरी यांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सपा प्रमुख अखिलेश यादव मैनपुरीच्या करहल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणाऱया अखिलेश यादव यांना घेरण्यासाठी भाजपने केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांना उमेदवारी दिली आहे. अखिलेश यादव यांचे काका शिवपाल सिंह यादव इटावामधील जसवंतनगर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. शिवपाल यादव येथून सातत्याने निवडणुका जिंकत आहेत. जसवंतनगर मतदारसंघातून भाजपने युवा नेते विनय शाक्मय यांना उमेदवारी दिली आहे, तर बसपने बिजेंद्र कुमार यांना तिकीट दिले आहे. या जागेसाठी काँग्रेसने उमेदवार दिलेला नाही. माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांच्या पत्नी लुईस खुर्शिद काँग्रेसच्या तिकीटावर फारुखाबाद सदर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 

पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यातील मतदानापूर्वी शुक्रवारी प्रचार संपला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कानपूर, मैनपुरी, करहाल आणि उन्नावमध्ये जाहीर सभांना संबोधित केले. त्याचवेळी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कानपूर आणि जालौनमध्ये जाहीर सभांना संबोधित केले.

पंजाबमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सभा गाजवल्या. तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पटियाला येथे भाजपच्या वतीने सभा घेतली. त्यांच्यासोबत कॅप्टन अमरिंदर सिंग होते. त्यांनी नंतर रोडशोमध्येही सहभाग घेतला. आम आदमी पार्टीच्या वतीने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी अमृतसरमध्ये बाईक रॅली काढली, तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रोड शो केला.

Related Stories

ए. राजा विरोधात सीबीआयकडून आरोपपत्र

Patil_p

दिल्लीतील कोरोना : मागील 24 तासात 39 नवे रुग्ण, एकही मृत्यू नाही

Tousif Mujawar

अयोध्येतील मशिदीचा आराखडा सादर

Patil_p

काँग्रेस प्रवेशासाठी प्रशांत किशोर सज्ज

Patil_p

आनंद सुब्रम्हण्यम यांना सीबीआयकडून अटक

Patil_p

पंतप्रधान कर्ज योजनांच्या नावाने बनावट ऍप्लिकेशन

Patil_p