Tarun Bharat

पंजाबमध्ये एका दिवसात 1,793 नवे कोरोना रुग्ण

Advertisements

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये मागील 24 तासात 1 हजार 793 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 5 हजार 220 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  


मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील एकूण 1,05,220 रुग्णांपैकी 81 हजार 475 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 3 हजार 066 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

  • 20,679 रुग्णांवर उपचार सुरू 


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 16 लाख 82 हजार 723 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 20 हजार 679 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 443 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 76 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

Related Stories

बिहार बनतेय घुबडांच्या पसंतीचे राज्य

Patil_p

यासिन मलिकला जन्मठेप

datta jadhav

लोकशाहीच्या जपणुकीसाठी कटिबद्ध राहुया!

Patil_p

दिवाळीपूर्वी आणखी एक खूषखबर

Amit Kulkarni

मुस्लिमांचे झुंडबळी हा गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारांचा परिणाम

Abhijeet Shinde

गोव्यात ऑक्सिजनअभावी 21 रुग्णांचा मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!