- विवाह आणि अंतिम संस्कारासाठी केवळ 20 जणांना परवानगी
ऑनलाईन टीम / चंदीगड :
कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेत पंजाब सरकारने देखील प्रदेशात अधिक कडक निर्बंध लादले आहेत. सोमवारी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आणि पूर्ण प्रदेशात नाईट कर्फ्यूची वेळ एक तासाने वाढवण्याचे आदेश दिले आहेत.


पंजाबमध्ये आता रात्री आठ वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे. तसेच प्रदेशात 20 ते 30 एप्रिल दरम्यान, सर्व बार, स्पा, थिएटर, कोचिंग क्लासेस, स्पोर्ट्स क्लब बंद असणार आहेत. यासोबतच लग्न समारंभ आणि अंतिम संस्कारसाठी आता केवळ 20 जणांना परवानगी देण्यात आली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सर्व खाजगी रुग्णालयात 75 टक्के बेड कोविड रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यास सांगितले आहे. 104 हा नंबर हेल्पलाईन म्हणून जारी करण्यात आला असून हा 24 तास उपलब्ध असणार आहे.
- तपासणीच्या किंमतीत घट
पंजाब सरकारने खाजगी रुग्णालयात देखील कोरोना चाचणीच्या किंमतीत घट करण्यात आली आहे. आता आरटी – पीसीआर टेस्ट 450 रुपयात केली जाणार आहे. तर रैपिड एंटिजेन टेस्ट 33 रुपयांमध्ये होणार आहे.
- रविवारी बंद राहणार बाजार
पंजाबमध्ये रविवरी रेस्टॉरंट बंद ठेवली जाणार आहेत. तर बाकीच्या दिवशी केवळ होम डिलिव्हरी सुरू असणार आहे. यासोबतच मॉल, बाजार आणि दुकाने रविवारी बंद ठेवली जाणार आहेत.