Tarun Bharat

पंजाबमध्ये काँग्रेसला बसणार झटका

Advertisements

नवज्योत सिद्धू ‘आप’च्या वाटेवर

वृत्तसंस्था/ अमृतसर

पंजाब काँग्रेसमधील मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग विरुद्ध नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. कॅप्टन यांच्याकडून दुर्लक्षिले गेलेले सिद्धू पुढील वर्षी होणाऱया निवडणुकीपूर्वी काँग्रेसला झटका देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. आम आदमी पक्षात सिद्धू सामील होऊ शकतात. एका ट्विटमध्ये त्यांनी विरोधी पक्षांकडून मिळत असलेल्या महत्त्वाचा उल्लेख केला आहे.

आमचा विरोधी पक्ष आम आदमी पक्षाने नेहमीच पंजाबसाठी माझे काम आणि व्हिजन ओळखला आहे. 2017 पूर्वी झालेला धर्मग्रंथाचा अनादर, अमली पदार्थांची तस्करी, भ्रष्टाचार आणि वीज संकट यासारख्या मुद्दय़ांवर मी पंजाबच्या लोकांसाठी आवाज उठविला होता. आज पुन्हा पंजाब मॉडेलसाठी मी बोलत आहे. प्रत्यक्षात पंजाबसाठी कोण लढतोय हे आप ओळखून असल्याचे सिद्धू यांनी ट्विट करत म्हटले आहे.

सिद्धू आणि अमरिंदर यांच्यातील राजकीय संघर्ष दिल्ली दरबारी पोहोचला होता. पण पंजाबमध्ये कॅप्टन हेच पक्षाचे नेतृत्व करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. याचमुळे सिद्धू काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद किंवा उपमुख्यमंत्रिपद सिद्धू यांना देण्यास कॅप्टन अमरिंदर यांचा विरोध आहे.

Related Stories

सर्वोच्च न्यायालयात कोरोनाचा शिरकाव

Patil_p

राजस्थान : लॉक डाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांनी सरकारी शाळेचा केला कायापालट

prashant_c

देशात निम्याहून अधिक रूग्णांची कोरोनावर मात

Patil_p

मध्यप्रदेश विविधतेने संपन्न : कमलनाथ

Patil_p

गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्ष ठाम

Patil_p

युपी : आणखी दोन दिवस वाढवले लॉकडाऊन!

Rohan_P
error: Content is protected !!