Tarun Bharat

पंजाबमध्ये गोळीबार करणारा ‘तो’ जवान वंटमुरीचा

चार सहकाऱयांची केली हत्या : अमृतसर बीएसएफ कॅम्पमध्ये घडली होती घटना : जवान मानसिकदृष्टय़ा होता अस्वस्थ

प्रतिनिधी /बेळगाव

पंजाबमधील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार करून चार सहकाऱयांचा बळी घेऊन स्वतःही जीवन संपविणारा जवान हुक्केरी तालुक्मयातील वंटमुरी गावचा आहे. त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती. तरीही त्याच्याकडे बंदुक का दिली? असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.

सत्याप्पा सिद्धाप्पा किलारगी (वय 33, रा. वंटमुरी) असे त्या जवानाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. ‘तरुण भारत’ने सत्याप्पाचा मामा बाळाप्पा पकाली यांच्याशी संपर्क साधला असता मंगळवारी सत्याप्पाचा मृतदेह वंटमुरीला येणार असल्याचे सांगितले.

सत्याप्पा हा बीएसएफचा जवान होता. त्याची मनस्थिती ठिक नव्हती. त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. दीड वर्षापूर्वी त्याने दहा लाख रुपये कर्ज घेतले होते. सुटीवर गावाला आला होता, त्यावेळी त्याची मनस्थिती ठिक नव्हती. त्याच्यावर मानसोपचारतज्ञांकडून उपचारही करण्यात आले होते. सुटी संपल्यामुळे उपचाराची माहिती आपल्या वरि÷ांना देऊन त्याने पुन्हा 15 दिवस रजा वाढविली होती.

एक महिन्यापूर्वी पत्नी मुलांसमवेत तो आपल्या युनिटला गेला होता. पत्नी मुलांना ठेवण्यासाठी तिथे व्यवस्था झाली नाही म्हणून त्यांना गावी सोडून तो एकटाच गेला होता. त्याची मनस्थिती ठिक नसताना त्याच्या हातात बंदुक का दिली? असा प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. अमृतसर येथील बीएसएफच्या कॅम्पमध्ये नेमके काय घडले, याची आपल्याला संपूर्ण माहिती नाही. रविवारी सत्याप्पाच्या भावाला बीएसएफच्या अधिकाऱयांनी फोन करून सांगितले. चौघांचा बळी घेऊन सत्याप्पाने स्वतःवरही गोळय़ा झाडून घेतल्याची माहिती दिली, असे कुटुंबीयांनी सांगितले.

Related Stories

नेगिनहाळ मठाधीशांवर अंत्यसंस्कार

Amit Kulkarni

विभागीय क्रीडा स्पर्धेत अबनाळी शाळेचे उल्लेखनीय यश

Amit Kulkarni

शहराच्या उत्तर भागात उद्या वीजपुरवठा खंडित

Amit Kulkarni

वेळ वाढवली तरी गर्दी कायम…

Amit Kulkarni

परिवहनच्या तिकीट बुकिंगला अल्पप्रतिसाद

Patil_p

समाजाला आदर्श व्यक्तिमत्वांची गरज

Patil_p