Tarun Bharat

पंजाबमध्ये मागील 24 तासात 4,124 नवीन कोविड रुग्ण

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. मागील 24 तासात 4,124 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर कालच्या दिवशी 6,397 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  


मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 52 हजार 235 पोहोचली असून त्यातील 4 लाख 87 हजार 859 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कालच्या दिवशी 186 जणांनी आपला जीव गमावला आहे, तर आतापर्यंत 13 हजार 827 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाढती मृत्यू संख्या ही भीतीदायक आहे. 


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 89 लाख 25 हजार 740 नमुने घेण्यात आले आहेत. यातील 75,435 नमुने काल एका दिवसात घेतले गेले. सद्य स्थितीत 50 हजार 549 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 6007 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 942 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

Related Stories

बांगलादेशला मिळाला पहिला तृतीयपंथीय न्यूज अँकर

Patil_p

भारताने कोरोना विरुद्धच्या लढाईत नोंदवले अनेक उच्चांक

Archana Banage

हिमाचलमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसवर कोसळली दरड; ५० ते ६०जण अडकल्याची शक्यता

Archana Banage

इंग्रजीऐवजी हिंदीसह स्थानिक भाषांना प्राधान्य द्यावे!

Patil_p

केरळमध्ये संघ स्वयंसेवकाची निर्घृण हत्या

Patil_p

कमर्शियल सिलिंडर 250 रुपयांनी महाग

Patil_p