Tarun Bharat

पंजाबमध्ये मागील 24 तासात 8,014 नवे कोरोना रुग्ण; 182 मृत्यू

  • ॲक्टिव्ह रुग्णांनी ओलांडला 63 हजारांचा टप्पा


ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील रुग्णांनी 4.07 लाखांचा टप्पा पार केला आहे. राज्यातील दैनंदिन आकडे आणि मृत्यूंची वाढती संख्या धडकी भरवणारे ठरत आहेत. मागील 24 तासात तब्बल 8 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. काल 8,015 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 182 जणांनी आपला जीव गमावला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  


मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 4 लाख 07 हजार 509 इतका झाला आहे. तर कालच्या दिवशी 6,701 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 3 लाख 34 हजार 677 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 9 हजार 825 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाढती मृत्यू संख्या ही भीतीदायक आहे. 

ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 75 लाख 10 हजार 673 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 67, 336 टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या. सद्य स्थितीत 63 हजार 007 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 8,457 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 240 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

Related Stories

सूरतच्या दुकानात मिळतोय ‘बचपन का प्यार’

Patil_p

अचाट खाण्यामुळे केले दुसरे लग्न

Patil_p

भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळे ६६ मुलांचा मृत्यू?; WHO कडून अलर्ट जारी

Archana Banage

देशात 54,736 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 17.5 लाखांवर

datta jadhav

केवळ पुरी येथील रथयात्रेला अनुमती

Patil_p

‘स्पुटनिक-व्ही’ची किंमत प्रतिडोस 995 रुपये

Patil_p