Tarun Bharat

पंजाब काँग्रेसला गळती, जोगिंदर यांचा आपप्रवेश

दलित नेत्याच्या प्रवेशामुळे ‘आप’ला बळ

वृत्तसंस्था/ चंदीगड

स्वतःच्या मृत्यूनंतर काँग्रेसच्या ध्वजात पार्थिव गुंडाळले जावे अशी इच्छा बाळगणारे पंजाबमधील दलित नेते जोगिंदर सिंह मान यांनी शुक्रवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. जोगिंदर यांनी शनिवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. जोगिंदर हे पंजाबमधील दलित समुदायाशी संबंधित प्रभावी नेते मानले जातात.

जोगिंदर हे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बूटा सिंह यांचे भाचे आहेत. दलितांना दहावीनंतर देण्यात आलेल्या शिष्यवृत्तीमधील घोटाळय़ाप्रकरणी कारवाई न होणे आणि फगवाडाला जिल्हय़ाचा दर्जा न दिल्याचा आरोप करत काँग्रेसमधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. राखीव मतदारसंघ असलेल्या फगवाडामध्ये काँग्रेसच्या उमेदवारीचे ते प्रबळ दावेदार होते. परंतु तिकीट न मिळण्याची शक्यता पाहता मान यांनी पक्ष सोडल्याचीही चर्चा आहे. मान हे कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले आहेत.

पंजाबच्या दलित नेत्यांमधील मोठे नाव असलेल्या जोगिंदर सिंह मान यांनी दलितांच्या मुलांच्या हितांचे रक्षण करण्यास काँग्रेस सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. शिष्यवृती योजनेच्या घोटाळय़ातील आरोपींना पक्षात आश्रय देण्यात आल्याने काँग्रेसमध्ये राहणे आता योग्य वाटत नसल्याचे ते म्हणाले. जोगिंदर हे तीनवेळा फगवाडाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Related Stories

केदारनाथ मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं

datta jadhav

12 बांगलादेशी घुसखोरांची धरपकड

Patil_p

भारतात डिसेंबरअखेर ‘कोव्हिशिल्ड’च्या 10 कोटी लस उपलब्ध होणार

datta jadhav

आजच्या चर्चेपूर्वी शेतकरी आक्रमक

Patil_p

गुजरात भाजपमय, हिमाचलात ‘हात’

Amit Kulkarni

लसीकरणातील गोंधळ संपता संपेना

Patil_p