Tarun Bharat

पंजाब निवडणुकीवर काळापैसा-ड्रग्सचे सावट

22 दिवसांत 82 कोटींचे अमली पदार्थ-मद्य जप्त ः 17 कोटींची बेनामी रक्कम ताब्यात

पंजाब निवडणुकीवर काळा पैसा आणि अमली पदार्थांचे सावट निर्माण झाले आहे. केवळ 22 दिवसांमये 82 कोटींचे अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत. यात सुमारे 7.5 कोटींचे मद्य देखील सामील आहे. तर आतापर्यंत सुमारे 17 कोटींची बेनामी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. आयोगाने आतापर्यंत 100 कोटींच्या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. अशाप्रकारची स्थिती पाहून निवडणूक आयोगाने शहरांपासून सीमेपर्यंत दक्षता वाढविली आहे.

अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पंजाबमध्ये पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. पंजाबला लागून असलेल्या हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि चंदीगडच्या सीमेवर विशेष सतर्कता बाळगण्यात येत आहे. पंजाबच्या पोलीस महासंचालक स्तरावर ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस महासंचालकांची बैठक पार पडली आहे. प्रत्येक राज्यात एक नोडल अधिकारी तैनात करण्यात आला आहे. तर चंदीगड, उत्तराखंड समवेत अनेक राज्यांच्या ड्रग कंट्रोलरांना पथकात सामील करण्यात आले आहे. याचबरोबर पंजाबमधील प्रत्येक जिल्हय़ात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पथक तैनात करण्यात आले आहे.

Related Stories

‘लव्ह जिहाद’ विरोधात उत्तर प्रदेशात अध्यादेश

Patil_p

आता रेशनकार्डधारकांना मिळणार २१ किलो गहू आणि १४ किलो तांदूळ

mithun mane

कोरोना संकट : पंजाब सरकारने 31 मे पर्यंत वाढविले लॉकडाऊन!

Tousif Mujawar

देशात आणखी 16 हजार बाधित

datta jadhav

दोष नव्हे दिशा देणारे सरकार निवडा!

Patil_p

संसर्गमुक्त आकडा 1 लाख पार

Patil_p