Tarun Bharat

पंजाब : पाकिस्तानच्या बाजूने ड्रोनमधून आलेले 11 ग्रेनेड जप्त

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

पाकिस्तानच्या बाजूने ड्रोनद्वारे पाठवलेले 11 ग्रेनेड हस्तगत करण्यात पंजाब पोलिसांना यश आले आहे. पंजाबच्या गुरदासपूर येथील भारत-पाक सीमेवरील दोरांगला गावात हे ग्रेनेड जप्त करण्यात आले. 

गुरुदरपूरच्या सीमेपासून एक किलोमीटर अंतरावर हे ग्रेनेड टाकण्यात आले. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पण, तपासात कोणतेही धागेदोरे समोर आले नाहीत. दोरांगला पोलीस ठाण्यात 3, 4, 5 स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

19 डिसेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास बीएसएफच्या 58 बटालियनला बीओपी चक्करीजवळ पाकिस्तानच्या बाजूने ड्रोनचा आवाज ऐकू आला. बीएसएफ जवानांवर ड्रोनमधून 18 राऊंडही फायर करण्यात आले. त्यानंतर बीएसएफ आणि पंजाब पोलीस पथकांच्या वतीने सीमाभागात शोध मोहीम राबवण्यात आली. याच झडतीदरम्यान गुरदासपूरयेथून ग्रेनेड हस्तगत करण्यात आले. 

Related Stories

जम्मूत एकवटले काँग्रेसमधील ‘जी-23’ नेते

Amit Kulkarni

PM मोदींच्या हस्ते 5G Testbed लाँच

datta jadhav

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील 730 डॉक्टरांचा मृत्यू

Tousif Mujawar

कोरोना : जम्मू काश्मीरमध्ये 1,329 नवे रुग्ण

Tousif Mujawar

देशात कोरोनाची लस मिळणार मोफत

datta jadhav

13 वर्षांनी पृथ्वीवर परतला भारताचा ‘हेर’

Patil_p