Tarun Bharat

पंजाब सरकारने वाढवला 2 आठवडे लॉकडाऊन

ऑनलाईन टीम / चंदीगढ : 

 कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने पंजाब सरकारने 3 मे ला संपणारा लॉकडाऊन आणखी 2 आठवडे वाढवला आहे. 17 मे पर्यंत हा लॉकडाऊन राहणार असल्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केली आहे. 

लॉकडाउनमधून बाहेर पडण्याची रणनिती ठरवण्यासाठी पंजाबमध्ये तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या तज्ज्ञांच्या समितीने दिलेला अहवाल तपासल्यानंतर अमरिंदर सिंह यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. 

जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना सकाळी 7 ते 11 या वेळेत सूट देण्यात आली आहे. कंटेन्मेंट आणि रेड झोनमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये 50 टक्के कर्मचारी काम करेल. तर रेशन दुकानांना रोटेशनल शेड्यूल्ड असणार आहे. दोन आठवड्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन, लॉकडाऊनबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असेही सिंग यांनी सांगितले. 

Related Stories

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; ५० हजारांच्या अनुदानासह ‘या’ सुविधा मिळणार

Abhijeet Khandekar

विदेशात 1.80 कोटी भारतीयांचे वास्तव्य

Patil_p

घाऊक महागाई दर 10.49 टक्क्यांवर

Patil_p

मोहम्मद जुबेरचा जामीन अर्ज नाकारला

Patil_p

दिलासा! चंदीगडमध्ये आता रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार दुकाने

Tousif Mujawar

वसूल केलेले ३.१८ कोटी देशमुखांनी संस्थेच्या नावे वळवले : ईडी

Archana Banage