Tarun Bharat

पंजाब : 1,501 नवे कोरोना रुग्ण ; 20 मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. रविवारी एक हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. मागील 24 तासात 1,501 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 20 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 97 हजार 755 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  


मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवसात 839 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 1,97,755 रुग्णांपैकी 1 लाख 80 हजार 133 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 6 हजार 072 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

  • 11 हजार पेक्षाअधिक रुग्ण ॲक्टिव्ह  


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 53 लाख 91 हजार 528 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 11 हजार 550 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Related Stories

देशमुख यांना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Patil_p

‘कलम 370’च्या वापसीवर ठाम!

Amit Kulkarni

नौशेरा सेक्टरमध्ये चकमकीत दोन जवान शहीद

prashant_c

थंडीत वाढतो हृदयविकाराचा धोका

Patil_p

विरोधात काही बोलू नका’ ही भूमिका चुकीची

Patil_p

अध्यक्षीय व्यवस्थेच्या प्रयत्नात संघ ; चिदंबरम

Patil_p
error: Content is protected !!