Tarun Bharat

पंढरपुरात बनावट कोरोना रिपोर्ट तयार करणारी वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब सील

Advertisements

पंढरपूर / वार्ताहर

बनावट कोरोना तपासणी अहवाल तयार करणारी वात्सल्य पॅथॉलॉजी लैबोरेटरीवर कारवाई करत गुरुवारी सील करण्यात आली आहे.
कोविड तालुका कृति समिती मार्फत पंढरपुर शहरातील अनधिकृत कोविड टेस्टिंग करुन बनावट रिपोर्ट वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब देत होती. याची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. गिराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले नायब तहसीलदार कोळी, पोलिस उपनिरीक्षक मगदूम यांच्या पथकाने अचानक धाड़ टाकली.

यावेळी वात्सल्य लॅब चालक आदमिले यास अवैध रिपोर्ट तयार करताना आणि रॅपिड अँटिजेंन टेस्ट किट सहित रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याला किट पूरवणारा तसेच बनावट अहवाल तयार करुन देणारा उमेश शिंगटे यालाही पकडले आहे. आदमिले व उमेश शिंगटे या
दोघानी हे काम गेल्या 2-3 महिन्यापासुन करत असल्याची कबुली दिली. याबाबत शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.

यावरून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुह्यात अजुन किती जण आहेत, याची चौकशी चालू आहे.अशा प्रकारची कोणतीही अनधिकृत कोविड टेस्टिंग आपल्या रुग्णालय अथवा लॅब मध्ये केली जात नाही. याची पंढरपुर शहर व तालुक्यातील सर्व डॉक्टर्स आणि पॅथॉथोलॉजी लॅब चालकानी दक्षता घ्यावी, असे आवाहन वैद्यकिय अधीक्षक डॉ. गिराम यानी केले आहे. जर असे काही आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

Related Stories

तुम्ही हिजाब कुठेही घालू शकता, फक्त… : सर्वोच्च न्यायालय

Abhijeet Shinde

सोलापूर : प्रत्येक मतदान केंद्रावर असणार आरोग्य कर्मचारी

Abhijeet Shinde

दिलासादायक : मालेगावात एका दिवसात 51 रुग्ण कोरोनामुक्त

Rohan_P

लोकलबाबत कठोर निर्णय घेण्याचा राजेश टोपेंचा इशारा

Abhijeet Shinde

UPSC परीक्षेचा निकाल जाहीर, यावर्षीही मुलींची बाजी

datta jadhav

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

Sumit Tambekar
error: Content is protected !!