Tarun Bharat

पंढरपुरात सात दिवसाचा लॉकडाऊन

Advertisements

प्रतिनिधी/पंढरपूर

पंढरपूर शहर आणि परिसरात 7 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या सात दिवसात कोरोनाची साखळी संपुष्टात आली नाही. तर आणखी तीन दिवसांचा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर येथे पत्रकार परिषदेत दिली.

पंढरपूरमध्ये गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आजमितीला पंढरपुरातील कोरोनाचा आकडा 585 पर्यंत पोहोचला आहे. यामध्ये 273 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत 295 रुग्ण हे बरे होऊन घरी गेले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी आणि सोलापूर शहरांमध्ये देखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन करण्यात आले होते. अगदी त्याच पद्धतीने पंढरपुरात देखील लॉकडाऊन हे सात दिवसांसाठी करण्यात येणार आहे.

पंढरपुरातील लॉकडाउनच्या काळामध्ये केवळ हॉस्पिटल, मेडिकल दुकाने आणि दूध व्यवसाय सुरू असतील. बाकी इतर सर्व आस्थापने बंद राहणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी यांनी सूचित केले. त्यामुळे शहरातील वाढता कोरोनाचा पादुर्भाव पाहता. लॉकडाऊनमुळे कोरोनाला ब्रेक लागेल. असे या निमित्ताने बोलले जात आहे.

Related Stories

जूनखेरपर्यंत पुणे शहरात कोरोनाचे ७५०० रुग्ण असतील

datta jadhav

मान्सूनचे केरळात आगमन, लवकरच महाराष्ट्रात

datta jadhav

दिल्लीत गेल्या 24 तासात 1075 नवे कोरोना रुग्ण; 21 मृत्यू

Rohan_P

राज्य सेवा परीक्षेचा नवा अभ्यासक्रम जाहीर

datta jadhav

पुणे-कोल्हापूर दरम्यान विद्युत इंजिनवर धावणार कोयना एक्स्प्रेस

datta jadhav

वीजबिलांच्या वसुलीवरच महावितरणचे अस्तित्व

Rohan_P
error: Content is protected !!