Tarun Bharat

पंढरपूरसह महाराष्ट्रातून बेळगावला गांजा पुरवठा

मिरजेतील दोघांना अटक : सीसीबीची कारवाई

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगावला गांजा पुरवठा केल्याच्या आरोपावरून सीसीबीच्या अधिकाऱयांनी मिरज, जि. सांगली येथील दोघा जणांना रविवारी अटक केली. त्यांच्याजवळून 8 किलो 300 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. बेळगावला जास्तीत जास्त गांजा पंढरपूर परिसरातून पुरवठा होत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील, एच. एस. निसुन्नावर, बी. एन. बळगन्नवर, एस. एस. पाटील, एम. एम. वडियर, एम. एस. बजंत्री, वाय. डी. नदाफ, एस. बी. पाटील आदींनी ही कारवाई केली आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली आहे.

अमन अक्रम जमादार (वय 20), फारुख आलमनवाज खान (वय 37) दोघेही रा. ख्वाजा बस्ती, मिरज अशी त्यांची नावे आहेत. फारुख हा सध्या जुनेदीनगर, कुडची, ता. रायबाग येथे राहतो. त्यांच्याजवळून 2 लाख 49 हजार रुपये किमतीचा 8 किलो 300
ग्रॅम गांजा, एमएच 10, डीसी 0426 क्रमांकाची दुचाकी व मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

पंढरपूर व महाराष्ट्रातील इतर भागातून गांजा आणून वेगवेगळय़ा ठिकाणी त्याची विक्री केली जात असल्याची कबुली वरील आरोपींनी दिली आहे.

Related Stories

तिसरे रेल्वेगेट उड्डाणपूल अंधारात

Patil_p

जिल्हा क्रीडांगणावर प्रवेशासाठी खेळाडूंकडून आकारले जातात शुल्क

mithun mane

भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांनी घेतली अमित शहांची भेट

Amit Kulkarni

खानापूरात कोरोनाबाधित गर्भवती माहिलेची यशस्वी प्रसूती

Tousif Mujawar

बेडकिहाळ येथे ऊसतोड यंत्राचे उद्घाटन

Omkar B

शिवप्रतिष्ठानतर्फे तिथीनुसार शिवप्रतापदिन साजरा

Amit Kulkarni