तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
येथील पंढरपूर सांगोला रस्त्यावर सातव्या मैल जवळ आज, शुक्रवारी (दि.12) सकाळच्या सुमारास जीप चा आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील पाच रहिवाशी मृत्युमुखी पडले. तर बारा जण जखमी झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सांगोला पंढरपूर रस्त्यावर रस्त्याच्या कडेला एक ट्रक (जीजे-03-डब्ल्यू-9355) उभा होता. अशातच बोलेरो गाडीतून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नजीकचे लोक हे (केए-04-एमबी -9476) या वाहनातून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत होते. बोलेरो गाडी चालकाचा ताबा सुटला आणि जीप थेट ट्रक वर जाऊन धडकली.
या अपघातात सखाराम धोंडीबा लांबोर, शालुबाई लक्ष्मण लांबोर (रा. धनगरवाडी बेळगाव), पिंकी उर्फ सुनिता बापू लांबोर, नागुबाई काळू लांबोर आणि तुकाराम खंडू कदम, बांद्राई कडवळे (रा. ता. चंदगड, जि. कोल्हापूर) हे मृत्युमुखी पडले आहेत.
तर उर्वरित जखमींना उपचारार्थ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींमध्ये धोंडीबा बापू लांबोर, कोंडदेवा बापू लांबोर ,कोमल बापू लांबोर , बबन लांबोर, भारती बापू लांबोर , बापू लांबोर , रोहित यशवंत कांबळे , कोंडीबा विठ्ठल लांबोर , काळूलाल लांबोर , नागुबाई कोकरे , धोंडीबा डोईफोडे अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत.


previous post
next post