Tarun Bharat

पंढरपूर : ट्रकची टेम्पोला धडक सहा जण जखमी

Advertisements

प्रतिनिधी/पंढरपूर

पंढरपूरहून कामतीकडे येणाऱ्या टेम्पोला ट्रकने धडक दिल्याने सहा जण जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

रंजना मनोहर पवार, तानाजी मुरलीधर पवार, जया अरुण ताकमोगे, सविता राजाराम छंदुरे, सुमन मुरलीधर पवार, मालती चंद्रकांत शिंदे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. वरील सर्व जण पंढरपूर येथे कामानिमित्त गेले होते . तेथील काम संपवून पुन्हा कामतीकडे टेम्पोत बसून येत होते. दरम्यान दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास टेम्पोला ट्रक ने ठोकरले. या अपघातात वरील सर्व जण जखमी झाले.. जखमी अवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

Related Stories

सोलापूर : पाण्यात वाहून गेलेल्या दादाराव चौधरींच्या कुटूंबाला तहसीलदार प्रदीप शेलार यांनी दिली भेट

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये 345 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 10 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

सोलापूर : महेश कोठे, तौफिक शेख यांना राष्ट्रवादीचा दणका

Abhijeet Shinde

सोलापूर : कोविड योद्धांना रांगोळीच्या माध्यमातून सलाम

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात 130 रुग्ण कोरोनामुक्त, 38 नवे पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

अभिप्राय नोंदणी उपक्रमात सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिसरा पुरस्कार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!