Tarun Bharat

पंढरपूर विठोबाचे मंदिर तीन दिवसांसाठी बंद

Advertisements

25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान दर्शन नाही

प्रतिनिधी / पंढरपूर

सावळ्या विठोबाची कार्तिकी वारी कोरोनाच्या सावटामुळे रद्द करण्यात आली. अशातच एकादशीला संचारबंदी असणार आहे. याबाबत मंदिर समितीकडून 23 नोंव्हेंबरपासून विठोबाचे दर्शन भाविकांसाठी बंद केले होते. मात्र आता मंदिर समितीने 23 आणि 24 रोजी दर्शन सुरू ठेवले आहे. मात्र 25 ते 27 नोव्हेंबर या काळात विठोबाचे दर्शन बंद असणार आहे.

साधारणपणे सात महिन्यांनंतर विठोबाचे दर्शन हे दिवाळी पाडव्याला राज्य सरकारच्या परवानगीनंतर सुरू करण्यात आले. मात्र अशातच कार्तिकी वारी रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यामुळे साहजीकच 22 नोव्हेंबरपर्यंत विठोबाच्या मुखदर्शनचे ऑनलाईन बुकिंग सुरू होते. कार्तिकीचा निर्णय राज्य सरकारकडून आल्यानंतरच 23 नोव्हेंबरनंतरचे बुकिंग सुरू केले जाईल, असा निर्णय मंदिर समितीकडून घेण्यात आला होता.

यानंतर नुकताच राज्य शासनाने कार्तिकीबाबतचे आदेश निर्गमित केले. यानंतर आता कार्तिकी एकादशीच्या पूर्वी 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी विठोबाचे ऑनलाईन बुकिंग करून मुखदर्शन भाविकांना मिळणार आहे. पण 25 ते 27 नोव्हेंबर अशा दशमी,  एकादशी आणि व्दादशी अशा मुख्य यात्रेच्या तीन दिवस मंदिरात कुठल्याही व्यक्तीला दर्शनास सोडता येणार नसल्याचे मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे चैत्री, आषाढी आणि आता कार्तिकी यात्रेतही राज्यातील तमाम विठ्ठलभक्तांना भगवंताचे दर्शन मिळणार नाही, हे निश्चित झाले आहे.

Related Stories

शंकर मारिहाळ यांना बढती

Amit Kulkarni

मराठीत परिपत्रके-फलकांसाठी मध्यवर्ती म. ए. समितीचे निवेदन

Amit Kulkarni

आंबेवाडी येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

Patil_p

विरोध पत्करून मोबाईल टॉवर उभारण्याचा प्रयत्न

Patil_p

लोककल्प फौंडेशनतर्फे दंतचिकित्सा शिबिर

Amit Kulkarni

महाराष्ट्रातील सर्व खासदारांना भेटणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!