Tarun Bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खुनाचा गुन्हा दाखल करा : आंबेडकर

Advertisements

कॉलरट्यूनवर प्रकाश आंबेडकरांचा आक्षेप, पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घाणाघाती टीका

सोलापूर/ प्रतिनिधी

हे सरकार कंगाल आहे, केंद्र आणि राज्य सरकार भिकारी सरकार आहे. त्यामुळे जगात तेलाच्या किमती पडलेले असताना तेलाचे भाव वाढलेत, ही नवीन चोरी आहे.  हे सरकार संघटित गुन्हेगारांच्या आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणून कार्यक्रम केला त्यामुळे कोरोनाचा शिरकाव झाला. पंतप्रधानांवर 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी घणाघाती टीका आंबेडकरांनी केली.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश

आंबेडकर यांनी कोरोना काळात प्रत्येकाच्या मोबाईलवर वाजत असलेल्या कॉलर ट्यूनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. तीन महिने झाले कोरोनाचा हॅलोट्यून वाजतोय प्रत्येक मोबाईलच्या माध्यमातून भीती दाखवली जाते. यामागे काय षडयंत्र आहे हे पंतप्रधानांनी बोलावे. आम्हाला रोगाशी लढायचं , रोग्याशी नाही अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

गुरुवारी, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. कोरोना पेक्षा जास्त लोक की टीबी ने दगावले होते. टीबी च्या वेळेस लॉकडाऊन झालं नव्हतं. कोरोना लॉकडाऊन झाल्या त्यामुळे अनेकजण उपाशी आहेत. सर्वसामान्यत कोरोनाची रिंगटोन लावून भीती निर्माण केली जात आहे. तीन महिने झाले तरी रिंगटोन बदलली नाही यामागे काय षड्यंत्र आहे हे मोदींनी सांगितले शिवाय कळणार नाही असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

30 तारखेची वाट न बघता सामान्य आयुष्य जगायला सुरुवात करा
शासनाने आपल्याला ब्लॅकमेल केल आहे. त्यामुळे आपले जीवन उद्ध्वस्त केले आहे. 30 जून या तारखेची वाट न बघता सामान्य आयुष्य जीवन जगायला सुरुवात करा असे माझे आवाहन आहे. आरोग्य विभागाने आम्हाला जगवलं, लॉकडाऊनमुळे नाही. लॉकडॉऊनमुळे अनेक लोक मानसिक रुग्ण झाले असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

 

   

   

Related Stories

बार्शी बायपास रोडवर लक्झरी बस आणि दुचाकीचा अपघातात एक ठार

Abhijeet Shinde

वरिष्ठ राष्ट्रीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या श्रावणी कटके हिला सुवर्ण

Rohan_P

उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध, सोमय्यांचा गंभीर आरोप

datta jadhav

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ‘महाराष्ट्र केसरी’

prashant_c

पुणे विभागातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 80 हजार 345 वर

Rohan_P

मोटारसायकलला टँक्टरने जोरात धडक दिल्याने आईवडिलांसह मुलगा जागीच ठार

Sumit Tambekar
error: Content is protected !!