Tarun Bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकळी दहा वाजता देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा करणार आहेत. 

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात तीन मे पर्यंत लॉक डाऊन जारी करण्यात आला आहे. या लॉक डाऊन मध्ये काही बाबींना सूट देण्यात आली आहे. मात्र विवध योजना करून देखील अजूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यात म्हणावी तशी  सफलता  मिळत नाही आहे. त्यामुळे आता कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढील रणनिती काय असावी, कशी असावी यावर चर्चा होऊ शकते. 

तसेच महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये लॉक डाऊन कायम ठेवायचा की नाही ? लॉक डाऊन कायम ठेवायचा असेल तर त्यात आणखी काय सूट देता येईल याचा आढावा देखील यावेळी घेतला जाणार आहे. 

कोरोनाबाबत सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची पंतप्रधानांची ही तिसरी वेळ आहे. मागच्या चर्चेच्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे राज्यात अडकलेले परप्रांतीय मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात यावी अशी मागणी केली होती. 

Related Stories

गृहराज्यमंत्र्यांच्या पुत्राला जामीन

Amit Kulkarni

“गेल्या ७० वर्षात काहीच झालं नाही तर भाजप काय विकत आहे?”

Archana Banage

CAA आंदोलनात काही राजकीय पक्ष व विदेशींचा हात : रामदेव बाबा

prashant_c

‘कोर्टाच्या बाहेर बसून तुला पत्र लिहितोय, आई मी नक्की परत येईन’; संजय राऊतांचे आईला भावनिक पत्र

Archana Banage

सिरम : ‘कोवोवॅक्स’ लसीची निर्मिती सुरू

Tousif Mujawar

रुग्णांना बेड मिळावेत यासाठी कठोर कार्यपद्धती अवलंबणार : महापौर किशोरी पेडणेकर

Tousif Mujawar