Tarun Bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर नवा विक्रम

वृत्तसंस्था / तैपैई :

चीनच्या हल्ल्याचा वाढता धोका पाहता तैवानने संरक्षण अर्थसंकल्पात प्रचंड वाढ केली आहे. तैवानने स्वतःच्या संरक्षण अर्थसंकल्पात 10 टक्क्यांची वृद्धी करत एकूण 1.4 अब्ज डॉलर्सची भर टाकली आहे. अमेरिकेच्या आरोग्यमंत्र्यांनी तैपैईचा दौरा केला असताना तैवान सरकारने संरक्षणनिधी वाढविण्याची घोषणा केली आहे.

चीन सातत्याने तैवान सामुद्रधुनीत स्वतःच्या हालचाली वाढवत आहे. चीनच्या लढाऊ विमानांनी सोमवारी अत्यंत संवेदनशील मेडियन रेषा ओलांडली होती. चिनी विमानांना पिटाळून लावण्यासाठी तैवानच्या वायुदलाने क्षेपणास्त्रs डागली होती. विशेष म्हणजे त्याच दिवशी अमेरिकेचे आरोग्यमंत्री एलेक्स अजार यांनी तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग वेन यांची भेट घेतली होती.

मोठा निधी

चीनने अमेरिकेच्या मंत्र्यांच्या दौऱयाची निंदा केली होती. चीनसोबतच्या तणावादरम्यान तैवानने स्वतःचा संरक्षण अर्थसंकल्प आता 453 अब्ज तैवानी डॉलर्सचा केला आहे. संरक्षण तरतुदीतील या संतुलित वृद्धीमुळे सैन्यसज्जता आणि युद्धाची तयारी करण्यास मदत मिळणार आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षा आणि क्षेत्रीय शांतता तसेच स्थैर्य सुनिश्चित करता येणार असल्याचे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

युद्धखोर चीन

चीनने दक्षिण चीन समुद्रात तैवानच्या भागावर कब्जा करण्यासाठी युद्धाभ्यासाच्या नावाखाली हजारो सैनिक उतरविले आहेत. याच्या प्रत्युत्तरादाखल तैवाननेही सुमारे 200 मरीन कमांडोंची एक तुकडी प्रतास बेटावर पाठविली आहे. चीनचे सैन्य या बेटावर हल्ल्याची योजना आखत असल्याचा इशारा तैवानच्या गुप्तचर विभागाने दिला आहे. चीनमध्ये या बेटाला डोंगसा या नावाने ओळखले जाते.

युद्धाभ्यासाच्या आडून…

चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी हैनान बेटावर मोठय़ा प्रमाणात सराव करण्याची योजना आखत होती, यात तैवानच्या बेटांवर कब्जा करण्याचाही प्रयत्न केला जाणार असल्याचे गुप्तचरांनी सांगितले आहे. पीएलएच्या दक्षिण कमांड थिएटरच्या निर्देशनात होणाऱया कथित युद्धाभ्यासात मोठय़ा प्रमाणावर मरीन कमांडो, लँडिंग शिप्स होवरक्राफ्ट आणि सैन्य हेलिकॉप्टर सामील होतील असे वृत्त जपानच्या क्योडो न्यूजने दिले आहे.

Related Stories

लोकांना हवी होती ‘ममता’ पण मिळाली ‘निर्ममता’

Patil_p

सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी 8 अटकेत

Patil_p

गांधी परिवारकडून केवळ डायलॉगबाजी

Patil_p

ब्रिटनमध्ये पैशांचे झाड, सर्वांची मनोकामना करते पूर्ण

Patil_p

1 जूनपासून नॉन एसी रेल्वे धावणार

Patil_p

चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन

Patil_p