Tarun Bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्रे आता पुस्तकरूपात!

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणपणी रोज रात्री विविध विषयांवर देवी ‘जगत जजनी’ ला उद्देशून लिहिलेली पत्रे पुढील महिन्यात पुस्तकरूपात प्रकाशित होणार आहेत. हे पुस्तक इंग्रजी भाषेत असतील. 

मिळालेल्या माहितीनुसार, हे पुस्तक हार्परकोलिन्स इंडिया प्रकाशित करणार असून मूळ गुजराती मध्ये लिहिलेली पत्रे प्रख्यात सिने समीक्षक भावना सोमय्या यांनी इंग्रजीत भाषांतरित केली आहेत. या पुस्तकाचे नाव ‘लेटर्स टू मदर’ असे आहे. हे पुस्तक इ-बुक स्वरूपात ही प्रसिद्ध केले जाणार आहे. 


ही पत्रे मोदी यांनी 1986 मध्ये लिहिलेल्या रोजनिशीतून घेतली आहेत. याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना मोदी म्हणाले, हा काही साहित्यिक लिखाणाचा प्रयत्न नाही. तर त्यामध्ये त्या काळातील माझ्या निरीक्षणांचे प्रतिबिंब आणि जे जाणवले त्या विचारांचा लेखाजोगा आहे. 


पुढे ते म्हणाले, मी काही लेखक नाही. आपल्यापैकी अनेक जण तसे नसतातही पण प्रत्येकाला आपल्या मनात भावना व्यक्त करायच्या असतात. माझ्या मनातही अशा भावनांचा कल्लोळ उठला की कागद आणि पेन हाती घेतल्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नसतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

Related Stories

‘माझ्या मंत्र्यांना हिंदी कळत नाही म्हणून…’; मिझोरोमच्या मुख्यमंत्र्यांचं गृहमंत्र्यांना पत्र

Archana Banage

जाखलेत राजरोसपणे अवैध दारू विक्रीला ऊत

Abhijeet Khandekar

मुंबईत आजपासून 11 जूनपर्यंत जमावबंदी

datta jadhav

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन एम्स रुग्णालयात दाखल

Archana Banage

Monsoon Update : राज्याच्या विविध भागात पावसाची दमदार एंट्री ,तर वीज कोसळून दोन मुलींचा मृत्यू

Abhijeet Khandekar

महाराष्ट्र : यंदाच्या गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी

Tousif Mujawar
error: Content is protected !!