Tarun Bharat

पंतप्रधान बिहारमध्ये 12 प्रचारसभा घेणार

पटना / वृत्तसंस्था

बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या प्रचारसभा केवळ भाजपसाठी होणार नसून रालोआसाठी असतील, अशी माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली. पंतप्रधानांच्या सभेवेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री नितीशकुमार देखील उपस्थित राहणार आहेत. 23 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर तसेच 1 आणि 3 नोव्हेंबर या चार दिवशी प्रत्येकी तीन सभांना पंतप्रधान उपस्थिती दर्शवणार आहेत.

बिहार निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासावर एनडीएला आशा आहेत. सध्याच्या नियोजनानुसार 23 ऑक्टोबरला सासाराम, गया आणि भागलपूरमध्ये सभा होईल. 28 ऑक्टोबरला दरभंगा, मुजफ्फरपूर आणि पटनामध्ये सभा पार पडल्यानंतर 1 नोव्हेंबरला छापरा, पूर्व चंपारण आणि समस्तीपूरमध्ये सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. 3 नोव्हेंबरला पश्चिम चंपारण, सहरसा आणि फारबिसगंजमध्ये सभा होणार आहे.

Related Stories

काँग्रेस पक्षाचा 138वा स्थापना दिवस साजरा

Patil_p

सौरभ कृपाल देशाचे पहिले समलैंगिक न्यायाधीश!

datta jadhav

चीनची आगळीक ठामपणे हाणून पाडली

Patil_p

आता मधुमेहावर प्रभावी आयुर्वेदिक उपचार

Patil_p

झारखंड सरकारने 1 जुलैपर्यंत वाढविला ‘आरोग्य सुरक्षा सप्ताह’

Tousif Mujawar

आईचे दूध… बुद्धीचा ठेवा

Patil_p