Tarun Bharat

पंतप्रधान मोदींच्या आधीच सोनिया गांधींचा देशवासियांना संदेश

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आज लॉक डाऊनचा शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 10 वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, तत्पूर्वीच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांच्या ट्विटरवर व्हिडियो पोस्ट करत देशवासियांना संदेश दिला आहे. 

त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये जनतेला शांत  राहण्याचे आणि संयम राखण्याची विनंती केली आहे. 

त्या म्हणाल्या, माझ्या देशवासियांनो तुम्हां सर्वांना नमस्कार! असे म्हणत, सोनिया गांधी यांनी कोरोनाच्या लढाईमध्ये दिवसरात्र कार्यरत असणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस या सर्वांचे कौतुक करत त्यांचे आभारही मानले तसेच लॉक डाऊन च्या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळा, नियमांचे काटेकोर पालन करा असे आवाहन ही यावेळी केले आहे. 

तसेच या काळात काँग्रेस कार्यकर्ते मदत करण्यास तत्पर असतील असे ही त्यांनी यावेळी सांगितले. 

लॉक डाऊनच्या काळात अनेक लोकांना हाल सोसावे लागत आहेत. मात्र, तरीही जनता कोरोनाला हरवण्यासाठी मदत करत आहे. यापेक्षा मोठी देशभक्ती काय असेल? या संकटावर आपण सर्व मिळून नक्की मात करू, कोरोनाला हरवू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

Related Stories

युपीएससी निकालात दिल्लीची श्रुती शर्मा टॉपर

Patil_p

जीवनावश्यक वस्तू कायदा बदलणार

Patil_p

मोठी कारवाई : दिवाळीच्या तोंडावर 20 लाखाचा भेसळ खवा जप्त

Archana Banage

‘कृषी’विषयक विधेयकांचा विरोधकांकडून अपप्रचार

Patil_p

बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार- शंभूराजे देसाई

Abhijeet Khandekar

दिल्लीत मागील 24 तासात 442 नवे रुग्ण; 12 मृत्यू

Tousif Mujawar
error: Content is protected !!