Tarun Bharat

पंतप्रधान मोदींच्या पुतणीलाच भाजपने नाकारले तिकीट

ऑनलाईन टीम / अहमदाबाद : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी सोनल मोदी यांना अहमदाबाद महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तिकीट नाकारले आहे. नव्या नियमांमुळे पंतप्रधान मोदींच्या पुतणीचे नाव उमेदवारांच्या यादीत नसल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.

सोनल मोदी या पंतप्रधान मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांची मुलगी आहे. प्रल्हाद मोदी शहरात रेशन दुकाने चालवतात आणि गुजरात फेअर रेट शॉप असोसिएशनचे ते अध्यक्षही आहेत. गुजरात भाजपने आगामी निवडणुकीत पक्षनेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिले जाणार नाही, असे नुकतेच जाहीर केले होते. या नियमांमुळे भाजपने सोनल यांना तिकीट नाकारले.

आपण पंतप्रधानांची पुतणी म्हणून नव्हे तर भाजप कार्यकर्ता म्हणून तिकीट मागितल्याचा दावा सोनल मोदी यांनी केला आहे.

Related Stories

नराधमाभोवतीचा ‘फास’ आवळला

Patil_p

‘महासत्ता’धीशाचे उद्या भारतात आगमन

tarunbharat

शिवसेनेत बंड, सरकार धोक्यात?

Patil_p

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना कार्यालयात घुसून मारहाण

Anuja Kudatarkar

केंद्र सरकारकडून अनेक मोठे फेरबदल

Amit Kulkarni

14 महिन्याच्या मुलीच्या आईची सुटका

Patil_p
error: Content is protected !!