Tarun Bharat

पंतप्रधान मोदींच्या संमतीने कोकणचा दौरा करतोय, फडणवीस-दरेकर साथीला- नारायण राणे


मुंबई \ ऑनलाईन टीम

गेल्या दोन दिवसात कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल 40 लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली. या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रिय मंत्री नारायण राणे कोकण दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या संमतीने कोकणचा दौरा करतोय. फडणवीस-दरेकर साथीला असणार आहेत, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्‍यासह रायगड जिल्ह्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत, असं ट्विट नवनिर्वाचित केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी केलं.

मुख्यमंत्री आज चिपळूणच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांचाही आज कोकण दौरा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर एकाच दिवशी चिपळूणची पाहणी करणार आहेत.

Related Stories

अजित कुऱ्हाडे दोन दिवसात कार्यभार स्वीकारणार

Patil_p

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी सदावर्तेंना जामीन मंजूर

Archana Banage

अधिवेशनाचा तिसऱ्या दिवशी विरोधकांचे विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन

Tousif Mujawar

आमदार शिवेंद्रराजेंसह समर्थकांना जामीन मंजूर

Patil_p

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे निधन

Tousif Mujawar

…येथे पोलिसांनाही द्यावी लागतेय लाच

datta jadhav