Tarun Bharat

पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाहतूक मार्गाचे उद्घाटन

Advertisements

उत्तर प्रदेशला होणार लाभ, 5,750 कोटी रूपयांचा खर्च

लखनौ / वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यू भावपूर ते न्यू खुजरा वाहतूक मार्गाचे उद्घाटन केले आहे. बृहत वाहतूक मार्ग योजनेचा हा एक भाग आहे. याची लांबी 351 किलोमीटर असून त्याची निर्मिती करण्यासाठी 5 हजार 750 कोटी रूपये खर्च आला आहे. या मार्गामुळे उत्तर प्रदेशात औद्योगिकरण वाढण्यासाठी साहाय्य होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

या प्रकल्पाबरोबरच पंतप्रधान मोदी यांनी पूर्वकेंद्रित वाहतूक मार्गाच्या नियंत्रण कक्षाचेही उद्घाटन प्रयागराज येथे केले. या प्रकल्पांचा लाभ या भागांमधील ऍल्युमिनियमच्या वाहतूकीसाठी होणार असून त्यामुळे मध्यम उद्योगांची वाढ होण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. फिरोझाबाद येथील काच उद्योग, इटावा येथील वस्त्रोद्योग आणि खुजरा येथील भांडी व्यवसायासाठी हा वाहतूक मार्ग लाभदायक ठरणार आहे. हाथरस आणि अलिगढ यांनाही फायदा होईल. सध्याच्या कानपूर-दिल्ली मार्गावरील भार या मार्गामुळे कमी होणार आहे.

विरोधी पक्षांवर टीका

विरोधी पक्ष सत्तेत असताना त्यांनी वाहतूक मार्ग विकसीत करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले, असा आरोप उद्घाटन प्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदींनी केला. मंगळवारी उद्घाटन झालेल्या मार्गाला 2006 मध्येच अनुमती मिळाली होती. तथापि, तेव्हापासून 2015 पर्यंत हा मार्ग कागदावरच होता. 2014 पर्यंत एक किलोमीटर रस्ताही बांधला गेला नव्हता. या दिरंगाईमुळे उत्तर प्रदेशचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले, असा आरोपही त्यांनी केला.

Related Stories

ममता बॅनर्जींच्या भाच्याला दुसऱ्यांदा ईडीची नोटीस

Amit Kulkarni

200 दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात

Patil_p

एलॉन मस्क यांच्या संपत्तीत घट

Patil_p

११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लसमहोत्सव’ साजरा करण्याची पीएम मोदींची घोषणा

Abhijeet Shinde

खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्राचे पाऊल

Patil_p

७५ वा स्वातंत्र्यदिन, ७५ दिवस नागरिकांना मोफत बूस्टर डोस

Abhijeet Shinde
error: Content is protected !!