Tarun Bharat

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 75 हजार घरांचे वितरण

उत्तर प्रदेशातील कार्यक्रम, विरोधी पक्षांवर कडाडून टीका

लखनौ / वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशात गरीबांसाठी बांधलेल्या 75 हजार घरांचे वितरण करण्यात आले आहे. मंगळवारी येथे झालेल्या कार्यक्रमात या घरांच्या चाव्या लाभार्थींना देण्यात आल्या. येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथसिंग आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात डिजिटल पद्धतीने या घरांचे हस्तांतरण लाभाथीँना केले. तसेच या लाभार्थींशी त्यांनी संवादही साधला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली. समाजवादी पक्षाने गरीबांसाठी घरे कधीही निर्माण केली नाहीत. मात्र, केंद्र सरकारच्या घरबांधणी योजनेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला.

9 लाख घरांची निर्मिती 

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2017 पूर्वी 18 हजार घरांना अनुमती देण्यात आली होती. तथापि, मागच्या समाजवादी पक्षाच्या सरकारने कधी 18 घरेही बांधली नाहीत. मात्र 2017 मध्ये भाजपचे सरकार लोकांनी उत्तर प्रदेशात निवडून दिल्यानंतर आदित्यनाथ सरकारने गेल्या साडेचार वर्षांमध्ये 9 लाख घरे बांधून ती गरीबांना वितरीत केली आहेत. तर आणखी 14 लाख घरे निर्माणाधीन आहेत. ती लवकरच पूर्ण केली जातील, असे प्रतिपादन त्यांनी केले.

प्रदर्शन-परिषदेचे उद्घाटन

याच दौऱयात त्यांनी आझादी 75-न्यू अर्बन इंडिया या प्रदर्शनाचे आणि परिषदेचे उद्घाटन केले. या प्रदर्शनात भारताच्या शहरी भागाचा चेहरा मोहरा कसा परिवर्तीत केला जात आहे, याचे चित्रण पहावयास मिळणार आहे. सध्याचे वर्ष देशाच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने या प्रदर्शनाचे आयोजन आहे.

Related Stories

कोरानाचा ‘उत्पात’..शेअरबाजारात ‘दाणादाण ’

tarunbharat

इस्रोकडून सर्वात वजनदार अग्निबाणाचे परीक्षण

Patil_p

38 सेलिब्रिटींच्या विरोधात एफआयआर

Patil_p

आता २ ते १८ वर्षांच्या मुलांनाही मिळणार कोरोनाची लस

Archana Banage

कृत्रिम ग्लेशियरवर अवलंबून गावकरी

Patil_p

अंदमान-निकोबारमध्ये भूकंपाचा धक्का

Patil_p