Tarun Bharat

पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

आणखी एका आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

थिंपू / वृत्तसंस्था

भूतान सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करणार आहे. ‘नगदग पेल जी खोरलो’ असे सदर पुरस्काराचे नाव असून हा सन्मान देण्याची घोषणा शुक्रवारी भूतान सरकारकडून करण्यात आली. मैत्रीपूर्ण द्विपक्षीय संबंध आणि सहकार्य वृद्धिंगत केल्यामुळे मोदी यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांना अनेक देशांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधानांना त्यांच्या अभूतपूर्व नेतृत्व आणि दृढ निश्चयामुळे हा सन्मान मिळाला. सर्व देशवासियांसाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.

भूतानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून या संदर्भात ट्विट करत घोषणा करण्यात आली आहे. ‘भूतानच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्याची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कोरोना महामारीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानसाठी जे सहकार्य आणि पाठिंबा दिला ते अतुलनीय आहे. पंतप्रधान मोदी या पुरस्काराचे मानकरी आहेत. भूतानवासियांकडून मोदी यांना खूप-खूप शुभेच्छा.’ असे ट्विट भूतान पंतप्रधान कार्यालयाने केले आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर भारतातील अनेक मान्यवरांनी आनंद व्यक्त केला आहे.

Related Stories

तुरुंगात भुयार खणून 6 कैदी फरार

Patil_p

भारतातील सद्यस्थिती दुःखद : नडेला

Patil_p

तिसऱया लाटेमुळे फ्रान्स ‘लॉकडाऊन’

Patil_p

युक्रेनच्या मदतीसाठी सरसावली आयएईए

Patil_p

नोटेवर 28 दिवसांपर्यंत जिवंत

Omkar B

तेच ज्यू रक्त……

Patil_p