Tarun Bharat

पंतप्रधान मोदींना सुरक्षा देणार नवी कार

Advertisements

एके-47 च्या गोळय़ा अन् स्फोटांना ठरविते निष्प्रभ : गॅस अटॅकही ठरणार अयशस्वी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात मर्सिडीजची नवी कार सामील झाली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही नवी कार आणली गेली आहे. ही कार मर्सिडीज-मेबॅक एस650 मॉडेलची आहे. ही कार अनेक अत्याधुनिक वैशिष्टय़ांनी युक्त आहे, परंतु यातील सर्वात खास बाब म्हणजे यावर गोळय़ा आणि बॉम्बस्फोटाचा कुठलाच परिणाम होत नाही. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱयादरम्यान अलिकडेच पंतप्रधान मोदींना या कारमध्ये पहिल्यांदा पाहिले गेले होते.

या कारमध्ये उच्चस्तरीय सुरक्षा कवच पुरविण्यात आले आहे. कारची विंडो ग्लास आणि बॉडी शेल अत्यंत मजबूत असल्याने त्याच्यावर एके-47 सारख्या जीवघेण्या बंदुकीच्या गोळय़ाही निष्प्रभ ठरतात. या कारला एक्सप्लोझिव्ह रेसिस्टेंट व्हेईकल (ईआरव्ही 2010) मानांकन प्राप्त झाले आहे. या कारमध्ये बसलेला व्यक्ती केवळ 2 मीटर अंतरावर होणाऱया 15 किलोग्रॅम पर्यंतच्या टीएनटी स्फोटातही सुरक्षित राहू शकतो.

विशेष व्यवस्था

कारच्या खिडक्यांवर पॉलिकार्बोनेटचा थर असल्याने सुरक्षेचा आणखी एक थर प्राप्त होतो. गॅस अटॅकच्या स्थितीत केबिनला स्वतंत्रपणे वायुपुरवठा देखील मिळतो. मर्सिडीज-मेबॅक एस650 कार विशेष रन-फ्लॅट टायर्सवरही धावू शकते. हल्ल्यानंतर टायर्सना नुकसान पोहोचल्याच्या स्थितीत ही कार वेग पकडू शकते.

विशेष आच्छादन

कारच्या फ्यूल टँकवर एक विशेष एलिमेंटचे आच्छादन देण्यात आले आहे. आच्छादन गोळी लागल्याने पडलेले छिद्र स्वयंचलित पद्धतीने सील करते. बोईंग एएच-64, अपाचे टँक अटॅक हेलिकॉप्टर्समध्ये वापरल्या जाणाऱया सामग्रीपासून हे आच्छादन तयार केले जाते.

मर्सिडीज-मेबॅक एस650 गार्डचे इंजिन अन् इंटीरियर

इंजिन ः या हायलेव्हर सिक्युरिटी कारमध्ये 6.0 लिटर ट्विन-टर्बो व्ही12 इंजिन  देण्यात आले आहे. हे इंजिन 516बीएचपीची ऊर्जा आणि 900 एनएमचा टॉर्क जनरेट करू शकते. कारचा कमाल वेग 160 किलोमीटर प्रतितास इतका आहे.

इंटीरियर ः कारमध्ये मसाज सीट असून त्यामुळे प्रवासादरम्यान संबंधितांचा थकवा दूर होतो. प्रवासी गरजेनुरुप लेगरुम वाढवू शकतो. कारच्या बॅक सीट्समध्येही बदल करण्यात आले आहेत.

आलिशान कारची किंमत

मर्सिडीज-मेबॅक एस560 गार्ड एक फेसलिफ्ट मॉडेल असून याची किंमत सुमारे 12 कोटी रुपये आहे. यात सुरक्षापातळी कुठल्याही अन्य कारच्या तुलनेत सर्वाधिक आहे. मर्सिडीज-मेबॅकने मागील वर्षी भारतात एस600 गार्ड ही कार 10.5 कोटी रुपयांमध्ये सादर केली होती.

एसपीजी ठरवते कार्सचे अपग्रेडेशन

नव्या कारचे अपग्रेडेशन सर्वसाधारणपणे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपकडून (एसपीजी) केले जाते. हे सुरक्षा दल देशातील प्रमुख व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी हाताळते. सुरक्षा आवश्यकता पाहून संबंधिताला वाहन अपग्रेडची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय एसपीजी घेत असते. अशा स्थितीत आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातील वाहनांना अपग्रेड करण्यात आले आहे. मर्सिडीज-मेबॅक एस650 गार्डला रेंज रोव्हर वोग आणि टोयोटा लँड क्रूझरपासून अपग्रेड करण्यात आले आहे.

Related Stories

भाजपकडून 50 कोटी रुपये अन् मंत्रिपदाची ऑफर : उमंग सिंघार

datta jadhav

ख्रिसमस-नववर्षावर ओमिक्रॉनचे सावट

Patil_p

लवकरच आधारद्वारे नव्या मतदारांची नोंदणी

Patil_p

बिहारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप घोषित

Patil_p

आयोगाकडून पोलीस अधिकाऱयांची बदली

Patil_p

नवज्योतसिंग सिद्धूंकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

Patil_p
error: Content is protected !!