Tarun Bharat

पंतप्रधान मोदींनी केला बायडेन यांना फोन; ‘या’ मुद्यांवर झाली चर्चा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. मोदींनी बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस यांचे अभिनंदन करत दोन्ही देशातील नाते आणि विविध मुद्यांवर चर्चा केली. मोदींनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. 

मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना फोन करुन अभिनंदन केले. तसेच कोरोनाची साथ, जागतिक तापमान वाढ आणि भारत- इंडो पॅसिफिक क्षेत्र यासारख्या संयुक्त मुद्द्यांवर चर्चा केली. 

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही मोदींनी बायडेन यांचे अभिनंदन केले होते. त्यावेळी दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र मिळून काम करण्याची आशा व्यक्त करतो, असे मोदींनी म्हटले होते.

Related Stories

मास्कसाठी कायदा करणारे ‘राजस्थान’ देशातील पहिले राज्य : अशोक गेहलोत

Tousif Mujawar

‘रेल रोको’ला संमिश्र प्रतिसाद

Amit Kulkarni

एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं ; सुहास कांदेंचा गंभीर आरोप

Abhijeet Khandekar

प्रत्येक घरात कोब्रा

Patil_p

देशाचा रिकव्हरी रेट 97.64 टक्क्यांवर

datta jadhav

रश्मी शुक्ला यांना अटकेपासून दिलासा

datta jadhav