Tarun Bharat

पंतप्रधान मोदींनी ‘या’ काँग्रेस मुख्यमंत्र्यांचं केलं कौतुक

Advertisements

नवी दिल्ली/प्रतिनिधी

राजस्थानात बासवाड़ा, सिरोही, हनुमानगड व दौसा या जिल्ह्यांतील चार वैद्यकीय महाविद्यालयांचे तसेच जयपूर येथील पेट्रोरसायन प्रौद्योगिकी संस्थेचे (सीआयपीईटी) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Prime Minister of India) यांनी केले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या कार्यक्रमास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया (Mansukh Mandaviya Union Minister for Health & Family Welfare) विरोधी पक्षनेत्या वसुंधरा राजे (Vasundhara Raje Former Chief Minister of Rajasthan) हेही सहभागी झाले होते. यावेळी मोदींनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं कौतुक केलं. त्यामुळे, राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. “राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (rajasthan cm ashok gehlot) हे माझे चांगले मित्र आहेत”, असं विधान पंतप्रधानांनी केलं आहे.

गुरुवारी (३० सप्टेंबर) राजस्थानमध्ये ४ वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभरणीच्या व्हर्च्युअल समारंभात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे आभार मानत कौतुक केलं आहे. “मुख्यमंत्री गहलोत यांनी राज्यासाठीच्या विकासकामांची यादीच माझ्यासमोर ठेवली आहे. यामधून हे स्पष्ट दिसून येतं की, वेगवेगळ्या राजकीय विचारधारा असूनही त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. यासाठी मी अशोक गेहलोत यांचे आभार मानतो. मुख्यमंत्री गहलोत हे माझ्याशी खुल्या मनाने बोलले. कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. ही मैत्री आणि विश्वासच हा लोकशाहीचा सर्वात मोठा विजय आहे”, असं मोदी म्हणाले. मोदींच्या या विधानानंतर गेहलोत देखील स्मितहास्य करताना दिसले.

Related Stories

विधानसभेत मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना भावनिक साद…

Archana Banage

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 151 पोलिसांना कोरोना; 5 मृत्यू

Tousif Mujawar

दहावी, बारावी परीक्षांसाठी आजपासून अर्ज

Tousif Mujawar

दिल्लीत 1877 नवे कोरोना रुग्ण; तर 65 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना होम पीचवरच आव्हान; राजीनाम्याची मागणी

Archana Banage

राज्यसेवा पुर्व परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू : जिल्हादंडाधिकारी

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!