Tarun Bharat

पंतप्रधान मोदी २४ ऑक्टोबर रोजी देशवासियांशी साधणार ‘मन की बात’

Advertisements

ऑनलाईन टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियाशी संवाद साधत असतात. यावेळी ते नागरिकांकडून अनेक कल्पना जाणून घेवून यशस्वी नागरिकांचे कौतुक करतात. मागील मन की बात कार्यक्रमात मोदींनी भारतीय संस्कृतीतील रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या महत्त्वावर भर दिला होता. यावेळी ते कोणत्या विषयाला प्राधान्य देतात हे पाहावे लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ ऑक्टोबर रोजी मन की बात या रेडिओ कार्यक्रमात आपले विचार मांडणार आहेत. मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा हा ८२ वा भाग असेल. हे कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ (AIR), दूरदर्शन, AIR न्यूज आणि मोबाईल अॅपच्या संपूर्ण नेटवर्कवर देखील प्रसारित केले जातील. खुद्द पंतप्रधानांनी याबाबत ट्विट करून माहिती शेअर केली. या भागासाठी आपल्या कल्पना सांगण्यासाठी मी तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो,” असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मन की बात हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मासिक रेडिओ कार्यक्रम आहे, जो प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो.

Related Stories

जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयास्पद ड्रोनच्या हालचाली

datta jadhav

इंडिया गेटवर नेताजींची होलोग्राम प्रतिमा

Patil_p

टीकेनंतरही तीरथसिंग वक्तव्यावर ठाम

Patil_p

धक्कादायक : सर्वोच्च न्यायालयाच्या गेटवर दोन जणांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

Rohan_P

जम्मूमधील प्राचीन मंदिरावर हल्ला

Patil_p

विरोधकांकडून शेतकऱयांची दिशाभूल

Patil_p
error: Content is protected !!