Tarun Bharat

पंधरा लाखाच्या ड्रग्जसह नायजेरियनास अटक

Advertisements

हरमल समुद्रकिनाऱयावर एएनसीची कारवाई : सापळा रचून एलएसडी, केकेन केले जप्त : आंतोनियोला सहा दिवसांची पोलीस कोठडी

प्रतिनिधी / पणजी

 अमलीपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) हरमल येथे केलेल्या कारवाईत 15 लाख रुपये किमंतीचा ड्रग्स जप्त केला आहे. या प्रकरणात एका नायजेरियन संशयिताला अटक केली आहे. संशयिताच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला असून रिमांडसाठी संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव आंतोनियो नवादीयालोर ओबिन्ना (42 वर्षे) असे आहे. संशयित मूळ नायजेरियन असून गेल्या काही महिन्यांपासून तो गोव्यात भाडय़ाच्या खोलीत राहत होता. ही कारवाई गुरुवारी रात्री 10.45 ते 2 वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली.

हरमल समुद्रकिनाऱयावर पकडले रंगेहात

वेलंकनी चॅपलजवळ, केपकर वाडा हरमल समुद्रकिनाऱयावर ड्रग्सची विक्री करण्यासाठी एक नायजेरियन व्यक्ती येणार असल्याची माहिती एएनसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी संध्याकाळपासूनच पोलिस सापळा रचून बसले होते. संशयित ठरलेल्या वेळेपेक्षा उशीराच ठरलेल्या ठिकाणी आला. तो ड्रग्सची विक्री करणार तोच त्याला रंगेहात अटक करण्यात आली. त्याच्याकडून 10.017 ग्राम एलएसडी, 48.688 ग्राम कोकिन जप्त करण्यात आला आहे.

एएनसीचे अधीक्षक महेश गावकर, निरीक्षक सुरज नाईक, सिताकांत नाईक उपनिरीक्षक रोहन मडगावकर व त्यांच्या टीमने ही कारवाई केली आहे. उपनिरीक्षक प्रियांका सावंत पुढील तपास करीत आहे.

वर्षभरात कोटय़वधींचे ड्रग्ज जप्त, अनेकांना अटक

डिसेंबर महिन्यात मोठय़ा प्रमाणात पाटर्य़ा होत असतात. त्याच अनुषंगाने गोव्यात मोठय़ाप्रमाणात ड्रग्स आल्याचा संशय आहे. पोलीस खात्याने राज्यातील अमलीपदार्थ प्रकरणांविरोधात कडक पावले उचलेली आहेत. 2020 सालात आत्तापर्यंत कोटय़वधी रुपये किंमतीचे ड्रग्स जप्त केले आहेत. अनेक संशयिताना अटक केली आहे.

एएनसी बरोबरच सीआयडीची एक टीम आहे ‘ऍक्टिव्ह’

राज्यतील ड्रग्स प्रकरणांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस खात्यात खास अमलीपदार्थ विरोधी विभाग (एएनसी) आहे. तरीसुध्दा अमली पदार्थ विरोधातील मोहीम अधिक कडक करण्यासाठी गुन्हा अन्वेषण विभागातील एक विशेष टीमला केवळ अमलीपदार्थांच्या विरोधातच काम करण्यास वरिष्ठ अधिकाऱयांनी बजाविल्याची माहिती खास सूत्रांकडून मिळाली आहे. या टीममध्ये दोन निरीक्षकांचा समावेश आहे.

रेव्ह पाटर्य़ांमधून ड्रग्जचा व्यववहार अधिक

राज्यात होणाऱया रेव्ह पाटर्य़ांमधून ड्रग्सचा व्यवहार मोठय़ाप्रमाणात होत आहे. अशाच प्रकारची एक पार्टी सीआयडी पोलीस टीमने उधळून लावली व अनेकांना अटक केली होती. याच पार्टीत सुमारे 9 लाख रुपये किमंतीचा ड्रग्सही जप्त केला होता.

Related Stories

राज्यात 15 दिवस सक्तीचे लॉकडाऊन करा : संजय बर्डे

Omkar B

केपेतून येणारी निवडणूक नक्कीच लढवणार

Amit Kulkarni

संयम आणि चिकाटीच्या बळावर महिलांची उत्तुंग भरारी

Amit Kulkarni

‘बलराम’च्या शिक्षकांनी जाणल्या कर्लातील विद्यार्थ्यांच्या समस्या

Amit Kulkarni

नागरिकांची बैठक रद्द नव्हे, लांबणीवर

Omkar B

लोकायुक्त, गृहकर्ज विधेयके 23 विरुद्ध 7 मतांनी संमत

Amit Kulkarni
error: Content is protected !!