Tarun Bharat

पक्षाशी एकसंध राहणार

Advertisements

काँगेसच्या जाहीर उमेदवारांची ग्वाही

प्रतिनिधी /पणजी

काँगेसची उमेदवारी जाहीर झालेल्या सहा जणांनी पणजीत काँग्रेस भवनात  एकत्र येऊन सर्वजण एकसंध असून काँगेस सोबतच राहणार असल्याची ग्वाही दिली.  2022 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसपक्ष बहूमताने विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेत येणार असल्याचा निर्धारही त्यांनी  केला. ज्यांनी पक्ष सोडून दगाबाजी केली त्यांना निवडणुकीत मतदारच धडा शिकवतील असेही उमेदवारांनी नमुद केले. तसेच उमेदवारी †िदली म्हणून पक्षाला त्यांनी धन्यवाद देवून आभार मानले.

पणजीत काँग्रेस भवनात उमेदवारी जाहीर झालेल्या पक्षाच्या सहा उमेदवारांनी पत्रकार परिषदेत हा दावा करून तशी ग्वाही दिली आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हे दिल्लीत असल्याने ते उपस्थित नव्हते. तर आलेक्स रेजीनाल्ड लॉरेन्स यांनी राजीनामा पत्र दिल्याने ते काँग्रेस पक्षातून बाहेर फ्sढकले गेले आहेत.

सुधीर कांदोळकर (म्हापसा), टोनी रॉड्रीग्स (ताळगाव), संकल्प आमोणकर (मुरगांव),  युरी आलेमांव (कुंकळ्ळी), राजेश वेरेकर (फ्ढाsंडा) आणि अल्टॉन डिकॉस्ता (केपे) हे काँग्रेसचे उमेदवार पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

गोव्यात आप, तृणमूल काँग्रेस या बाहेरील पक्षांनी ‘पैसा फ्sढको तमाशा देखो’ असा घोडेबाजार चालवला असून त्यात भाजपही सामील आहे. उमेदवार, आमदारांना पैशाचे आमिष दाखवून फ्ढाsडायचे आणि विकत घ्यायचे  अशी जणू काही स्पर्धाच चालू आहे. त्यास उमेदवार, आमदार बळी पडत असून त्यांना जनतेचे मतदारांचे कोणतेच सोयरसुतक नसल्याची टीका सर्व काँग्रेस उमेदवारांनी केली आहे. आम्हांलाही आमिषाचे गाजर दाखवून विविध पक्ष फ्ढाsडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु आम्ही काँग्रेसशी एकनिष्ठ असून 2022 निवडणुकीनंतर गोव्यात काँग्रेस पक्षाचेच सरकार स्थापन होईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

वायबंट मडगाव पॅनलच्या जया आमोणकर यांचा प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

पेडणेसाठी खासदार निधीतून सर्वतोपरी सहकार्य करणार

Amit Kulkarni

निरिक्षक सागर एकोस्कर यांना निलंबित करावे

Patil_p

हैदराबाद एफसीचा केरळवर विजय

Amit Kulkarni

काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी गोवा भेटीवर

Amit Kulkarni

संदीप खांडेपारकरांनी भाजपा सोडली

Patil_p
error: Content is protected !!