Tarun Bharat

पगार कमी-खर्च जास्त सामान्य जनता झाली त्रस्त

सांबरा/ वार्ताहर

पेट्रोल डिझेलसह घरगुती गॅस सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढतच असल्याने सर्वसामान्य जनता अक्षरशः भरडली जात आहे. सरकारने हे दर कमी करून सामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

सध्या बेळगावमध्ये पेट्रोलचा दर 105 रुपये तर डिझेलचा दर 95 रुपये प्रति लिटर आहे. अलीकडेच घरगुती गॅस सिलेंडरचा वाढीव दर 900 रुपयांवर पोहोचला आहे.बिकट आर्थिक परिस्थिती असलेल्यांची अवस्था पगार कमी व खर्च जास्त अशी झाल्याने त्यांना घर चालविणे अवघड होऊन बसले आहे. दुचाकी वापरणेही अवघड होऊन बसले आहे.

घरगुती सिलेंडर 900 रुपयांवर

‘सरकारने ग्रामीण भागामध्ये धूरमुक्त गावे करण्यासाठी मोफत कनेक्शन दिले. सुरुवातीच्या काळात सबसिडीही देण्यात येत होती. सिलेंडरचे दर वाढत असले तरी सबसिडी मिळत असल्याने सामान्य नागरिकांनी फार काहीसा विचार केला नव्हता. मात्र त्यानंतरच्या काळात सिलेंडरला मिळणारी सबसिडी पूर्णपणे बंद करण्यात आली आणि सिलेंडरच्या दरात अतोनात वाढ करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांना आता गॅस सिलेंडर वापरणे परवडणार नसल्याने ग्रामीण भागात आता पुन्हा चुली वापरण्यास प्रारंभ केला आहे. सरकारच्या या धोरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. असेच जर दर वाढत राहिले तर जगायचे कसे, असा प्रश्न सामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.

Related Stories

अर्जुनवीर श्री साई सोशल – ऍक्सेस डेव्हलपर्स सीसीआय यांच्यात आज अंतिम लढत

Amit Kulkarni

ओंकारनगरमध्ये सांडपाण्यामुळे रहिवासी हैराण

Amit Kulkarni

पोलीस स्थानकाजवळ उपनिरीक्षकावर हल्ल्याचा प्रयत्न

Amit Kulkarni

माती वाचवा जनजागृती बाईकरॅलीचे स्वागत

Amit Kulkarni

महापालिका वॉर्ड पुनर्रचना कधी?

Patil_p

क्रिकेट कोचिंग इन्स्टिटय़ूट संघाचा 56 धावांनी विजय

Amit Kulkarni