कसबा बावडा/प्रतिनिधी
सतत सुरु असलेल्या पावसाने पंचगंगा नदी पातळीत पाण्यात वाढ होत आहे राजाराम धरण क्षेत्रात सायकाळी ५ वाजता पाणीपातळी २५ फुटापर्यत होती.
पंचगंगा नदीचे पाणी पात्रभरुन वहात आहे. पाणी पातळी वाढत असुन पात्राबाहेर केव्हाही बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.
पावसाचा जोर पाश्चिम भागात आहे. या परिसरात उघडझाप असली तरी पावसाची रिपरिप सुरूच आहे. दुपारी -थोडी उघडीप झाल्यावर नदी धाटावर पाणी पाहाण्यास नागरिकांनी गर्दी केली होती.


previous post