Tarun Bharat

पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला

ऑनलाईन टीम / चंदीगढ :

पंजाबच्या पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटवर रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ग्रेनेडचा स्फोट झाला. दुचाकीस्वारांनी गेटवर ग्रेनेड फेकल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजद्वारे दुचाकीस्वारांचा शोध सुरू असून, परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पठाणकोटचे एसएसपी सुरेंद्र लांबा म्हणाले, पठाणकोटमध्ये वायुसेनेचे कॅम्प, लष्कराच्या दारूगोळ्याचा डेपो आणि लष्काराचे दोन ब्रिगेड आहेत. हा भाग लष्करासाठी महत्त्वाचा असल्याने तो दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असतो. मध्यरात्री एकच्या सुमारास आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटजवळ स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून लष्कराचे जवान आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी दुचाकीस्वारांनी ग्रेनेड फेकत हा हल्ला केल्याचे समजले. स्थानिक पोलीस यंत्रणेने घटनास्थळी ग्रेनेडचा भाग जप्त केला आहे. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, तपास सुरू आहे.

Related Stories

यशस्वी मध्यस्थीनंतर कमांडोची सुटका

Amit Kulkarni

कोल्हापूरला धोका वाढला; राधानगरीचे चार दरवाजे उघडले

Archana Banage

‘सीबीएसई’चे वेळापत्रक मंगळवारी जाहीर होणार

Amit Kulkarni

नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत दोन पोलीस शहीद

Patil_p

दहावीचा निकाल जाहीर ; यंदाही मुलींनी मारली बाजी

Abhijeet Khandekar

Sikandar Shaikh माझ्यासोबत जे घडल ते चुकीचं…माझा संघर्ष सुरूच राहील- सिकंदर शेख

Abhijeet Khandekar