Tarun Bharat

पडलवाडी जंगलातील वाळू तस्करीची तहसीलदारांकडून पाहणी

Advertisements

खानापूर/ वार्ताहर

गेल्या अनेक दिवसापासून खानापूर तालुक्मयाच्या जंगलप्रदेशात वाळूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदारांनी याची गांभीर्याने दखल घेऊन वनअधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले आहे. गेल्या आठवडय़ाभरात हलशी भागातील पडलवाडी येथील बेकायदा वाळू उपसाची दखल येथील तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी घेत शनिवारी परिसराची पाहणी केली. सदर बेकायदेशीरपणे करण्यात आलेला वाळूसाठा तात्काळ सार्वजनिक बांधकाम खात्याने पंचनामा करून जप्त करावा, असे आदेश बजावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडलवाडी जंगलात मोठय़ा प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. याबाबत ‘तरुण भारत’मधून वृत्त प्रसिद्ध होताच वनखाते आणि महसूल खात्याला जाग आली. त्यामुळे तालुक्मयातील वाळूमाफियांना चांगलीच चपराक बसली आह.s गेल्या अनेक दिवसापासून कोरोना महामारीच्या काळात या भागातील अनेक वाळूमाफियांनी वनखात्याच्या कनि÷ कर्मचाऱयांना हाताशी धरून वनखात्याच्या अखत्यारित जमिनीत वाळूतस्करी होत असल्याचे यावरून दिसून आले आहे. खानापूर वनविभागात येणाऱया पडलवाडी जंगलातील नाल्यात शेकडो ट्रक वाळू उपसा करून साठा करण्यात आला आहे. वनखात्याच्या कर्मचाऱयांनी याकडे दुर्लक्ष चालविले होते. काही स्थानिक समाजसेवकांच्या निदर्शनास आल्यानंतर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच प्रकार वनखातेही जागरूक झाले. या भागाच्या वनक्षेत्रपाल कविता इरनट्टी यांनी याची दखल घेऊन वाळू तस्करी करणाऱया अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविला होता. परंतु ठोस कारवाई करण्यात आली नाही. मात्र शोध करून नेमका कोण तो ठेकेदार, याची चौकशी करण्यास मात्र वनखात्याने नाकर्तेपणा दाखवल्याने पर्यावरणप्रेमींतून संताप व्यक्त करण्यात येत होता. या प्रकरणात बडय़ा वाळूमाफियांचा हात असून त्यांना वनखात्याचा वरदहस्त लाभल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदार तालिकोटी यांनी पडलवाडीच्या जंगलातील बेकायदा वाळूउपसा करण्यात आलेल्या ठिकाणांची पाहणी केली. मोठय़ा प्रमाणात वाळू उपसा करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी याविरोधात कडक कारवाई करण्याची सूचना महसूल विभागाला दिली आहे. घटनेची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे तहसीलदार श्रीमती रेश्मा तालीकोटी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. खानापूर तालुक्मयात जंगलसंपत्ती असलेल्या भागात वाळू म्हणजे सोने देणारी अंडी समजली जाते. शासनाने वाळूबंदी उपशावर निर्बंध आणल्याने अनेक वाळूठेकेदारांचे धाबे दणाणले. मात्र अधिकाऱयांच्या आशीर्वादाने पडद्याआड चोरटी वाहतूक सुरूच असल्याने पर्यावरणप्रेमींतून संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी या भागातील जंगल प्रदेशात अनेकदा वाळू तस्करी करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. केवळ वाळूतस्करी नव्हे तर जंगल संपत्तीही नष्ट झाली आहे. जंगलातील उत्तम प्रतीच्या लाकडांची चोरी प्रकरणे अनेकवेळा उघडकीस आले आहेत. वनखात्याचे अधिकारी याबाबत कितपत गांभीर्याने घेतात याचाही विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण पडलवाडीच्या जंगलात काढण्यात आलेली शेकडो ट्रक वाळू नेमके कुणाच्या आशीर्वादाने काढण्यात आली आहे. याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई होणे अत्यंत गरजेचे असताना वनखात्याचे अधिकारी अद्याप अनभिज्ञ का आहेत, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Related Stories

तज्ञ समितीची धुरा जयंत पाटील यांच्याकडे

Patil_p

एमबीएच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

Omkar B

राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हा सरकारी कर्मचारी क्रिकेट संघाची निवड

Amit Kulkarni

सुवर्णसौध येथे बेळवडी मल्लम्मा यांचा पुतळा उभे करा

Patil_p

मुलांच्या लसीकरणाला पालकमंत्र्यांच्या हस्ते चालना

Amit Kulkarni
error: Content is protected !!