Tarun Bharat

पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर/प्रतिनिधी

आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. पडळकर सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीवर एका तरुणाने हल्ला केला होता. यांनतर तो युवक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे पडळकरांनी म्हंटले होते. दरम्यान, पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या दोन तरुणांना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गोपीचंद पडळकर गुरुवारी घोंगडी बैठकीसाठी सोलापुरात आले होते. त्यावेळी श्रीशैल नगर येथे त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यावेळी त्या युवकाने शरद पवारांच्या नावाच्या घोषणा दिल्याचे म्हंटले होते. त्यानंतर पोलिसांनी ओळख पटवून आरोपी तरुणांचा शोध सुरु केला होता. गेल्या तीन दिवसांपासून पडळकरांच्या दगडफेक करणारा तरुण अमित सुरवसे आणि त्याचा साथीदार निलेश क्षीरसागर हे फरार होते. त्यांना लवकर पकडणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. अखेर त्यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिपरगा येथुन शनिवारी दुपारी ताब्यात घेण्यात आले आहे. अमित सुरवसे हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे किंवा नाही याबाबत त्याच्याकडे पोलीस चौकशी करत आहेत. तसेच त्याने दगडफेकी सारखे पाऊल कुणाच्या सांगण्यावरून उचलले आहे का, याचा देखील तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली.

Related Stories

कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक होणारच

datta jadhav

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

Abhijeet Khandekar

सातारा : आज १४ जणांना डिस्चार्ज, ४३९ जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Archana Banage

रूग्ण वाढीचा वेग दुप्पट : मनपा क्षेत्राला विळखा

Archana Banage

कमी पटसंख्येच्या शाळेबाबत काय म्हणाले? शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Rahul Gadkar

शिवसेनेकडून पक्षादेश जारी, आमदारांना व्हीप लागू

Rahul Gadkar