Tarun Bharat

पणजीतील दोन हॉटेल्सचे कोरोना रुग्णांसाठीचे आरक्षण रद्द

प्रतिनिधी/ पणजी

पणजी पाटे ते मळा रुआ दि ओरोम खाडी भागातील हॉटेल सेना व पारडिसो ही दोन हॉटेल्स कोरोना संशयित रुग्णांसाठी आरक्षीत केल्याची माहिती येथील जागरुक नागरिकांबरोबच या भागातील नगरसेवक विठ्ठल चोपडेकर व स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात यांना मिळताच त्यांनी या भागात खळबळ माजण्यापूर्वीच उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांच्याकडे चर्चा करून दोन्ही हॉटेल्स रद्द करण्याची मागणी केली. अखेर या मागणीला अनुसरुन ही हॉटेल्सचे कोरोना रुगणांसाठी केलेले आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

यावेळी महापौर उदय मडकईकरही उपस्थित होते. पणजीतील रुआ दि ओरम ते मळा हा परिसर शासनाने पोर्तुगीज झोन म्हणून जाहीर केला आहे. या भागात पोर्तुगीज काळातील अनेक जुनी घरे जशाची तशी ठेवण्यात आली आहेत. या घरातून राहणारे जास्तीत जास्त लोक वयस्क आहेत. त्यामुळे कोरोनासारखा भयंकर रोग पसरण्याची भीती होती. निर्माण होणार होती. परदेशात तसेच अनेक राज्यात कोरोनामुळे अडकून पडलेले गोव्यातील स्थानिक नागरिक परतण्यासाठी धडपडत आहेत.

सरकारदरबारी मान्यता मिळताच अशा लोकांना प्रथम क्वारंटाईन करावे लागत असल्याने अनेक हॉटेल्स बुकिंग करण्यात येत आहेत. याची माहिती स्थानिकांना मिळाल्यास गैरसमजातून वाद निर्माण होऊ शकतात. यासाठी असे वाद व गैरसमज टाळण्यासाठी शासनाने स्थानिक आमदार महापौर, नगरसेवक, सरपंच, पंचसदस्य अशा लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन तसेच त्याच भागातील समस्या जाणून घेऊन एखाद्याची होम क्वारंटाईन व्यवस्था करण्यात यावी, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Related Stories

‘तमनार’ला दिलेल्या परवान्यावरून दिशाभूल करण्याचे प्रयत्न

Patil_p

मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने घेतली वाहतूक संचालकाची भेट

Omkar B

चॅट बॉक्स (प्रकाश) ऍपचे आज उद्घाटन

Amit Kulkarni

युवकांनी संगीतातून करिअर घडवावे

Amit Kulkarni

टायर चोरीप्रकरणी दोघांना अटक

Patil_p

केपे पालिकेत काल 30 उमेदवारी अर्ज

Amit Kulkarni