Tarun Bharat

पणजीत सुमारे 1 लाखाचा गुटखा जप्त

महापौर उदय मडकईकर यांची माहीती

प्रतिनिधी / पणजी

शुक्रवारी संध्याकाळी पणजी महानगरपालिकेतर्फे पणजी मार्केट जवळील किस्मत हॉटेलजवळ दोन दुकानावर धाड टाकून सुमारे 1 लाख रुपयांचा गुटखा माल जप्त करण्यात आला होता. सोमवारी या मालची छाननी करण्यात आली असून यात 50 हजार रुपयांचा गुटखा तर 50 हजार रुपयांची सिगरेटची पाकिटे जप्त करण्यात आली आहे. अशी माहीती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.

पणजी मार्केट जवळील महादेव जनरल स्टोअर्स आणि महालक्ष्मी जनरल स्टोअर्स या दोन दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात हा माल जप्त करण्यात आला आहे. मनपाच्या बाजार निरिक्षकांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे.

गुटखा विकणाऱयांना अनेकदा या संदर्भात इशारा देण्यात आला होता. परंतु आता शहरात गुटखा विक्री करणाऱयावर कडक कारवाई मनपातर्फे करण्यात येणार आहे. अशा प्रकारची कारवाई आता यापुढे सुरुच राहणार आहे. गरज पडल्यास मोठय़ा प्रमाणात दंड आकारुन दुकाने सिल करण्यात येईल. असे देखील मडकईकर यांनी अधिक माहीती देताना सांगितले.

Related Stories

खोर्लीतील प्राध्यापिकेच्या खुनाने खळबळ

Amit Kulkarni

सोलर फेरीबोटीचा फ्लोटरमुळे चोडणवासियांसमोर संकट

Patil_p

गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले

Omkar B

तर फोंडय़ातील काँग्रेस उमेदवारीचा माझा मार्ग मोकळा

Patil_p

मडगावात कोसळलेल्या झाडांचे अडथळे वेळीच दूर : मुख्याधिकारी

Amit Kulkarni

चर्चिलनी 50 कोटीसाठी मतदारांचा विश्वास विकला

Amit Kulkarni