Tarun Bharat

पणजी – फोंडा महामार्गावर ओल्ड गोव्यात खड्डय़ांचे साम्राज्य

वार्ताहर/ पणजी

पणजी ते फोंडा महामार्गावर ओल्ड गोवा येथे दरगाह ते रेल्वे ओव्हरब्रीजपर्यंतच्या अंतरातील रत्यावर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले असून वाहन चालकांना मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावे लागत आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण ओल्ड गोवा येथील सेंट झेवियर फेस्तापूर्वी करण्याची मागणी वाहन चालकांबरोबर रहिवाश्यांकडून होत आहे.

ओल्ड गोवा येथील दरगाह आणि कोकण रेल्वे ओव्हरब्रीजच्या मधोमध असलेल्या रस्त्यावर गेल्या कित्येक महिन्यांपासून खड्डे पडले असून पावसाळ्य़ात तर वाहनचालकांना खड्डे चुकविण्यासाठी कसरत करीत वाहने हाकावी लागली होती. पावसाळ्य़ानंतर खड्डय़ांमध्ये पावडर मिश्रीत खडी टाकण्यात आली होती. काही दिवसानंतर खड्डी रस्ताभर पसरुन खड्डय़ांनी परत डोके वर काढले. पावडर मिश्रीत खडीमुळे परिसरात धूळ प्रदूषण होऊन स्थानिक रहिवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्यावर उतार – चढाव असल्याने दरवर्षी पावसाळ्य़ात पाणी साचून राहते. त्यामुळे तो वारंवार खराब होत असतो. तात्पुरते केलेले डांबरीकरण पावसाळ्य़ात वाहून जाते. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी रस्त्याची पाहणी करुन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Related Stories

प्रियोळात मगो-भाजपामध्ये काटेकी टक्कर

Amit Kulkarni

निरंकाल येथे रस्त्यावर झाड कोसळून वाहतूक ठप्प

Amit Kulkarni

…तर कळंगुटचे गावपणच संपेल

Amit Kulkarni

राज्यातील रस्ते दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करणार

Amit Kulkarni

ऑन-लोनवर आदिल खान हैदराबादकडून एफसी गोव्याला

Amit Kulkarni

मोपासाठी 7218 झाडे कापणार

Amit Kulkarni